शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

वाडीत महावितरणचे ‘ब्रेकडाऊन’

By admin | Published: August 03, 2016 2:45 AM

खडगाव मार्गावरील बहुतांश भाग मंगळवारी महावितरणच्या ‘ब्रेकडाऊन’मुळे अंधारात बुडाला.

नागरिकांमध्ये संताप : वाढत्या तक्रारींमुळे कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील फोन उचलून ठेवला नागपूर : खडगाव मार्गावरील बहुतांश भाग मंगळवारी महावितरणच्या ‘ब्रेकडाऊन’मुळे अंधारात बुडाला. याबाबत नागरिकांच्या वाढत्या तक्रारी पाहता कर्मचाऱ्यांनी दूरध्वनी उचलून बाजूला ठेवून दिला. त्यामुळे फोन ‘एन्गेज’ असल्याचे सांगितले जात होते. कर्मचाऱ्यांच्या या कृतीमुळे वाडीमध्ये संताप पसरला आहे. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता. वाडीच्या खडगाव मार्गावर एका ठिकाणी ‘ब्रेकडाऊन’ झाले. स्फोट झाल्यासारखा आवाज होऊन सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास खडगाव मार्गावरील कोहळे ले-आऊट, टेकडीवाडी, वेणानगर, रतनविहारसह अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला. बऱ्याच वेळानंतर वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांनी याबाबत महावितरणच्या कार्यालयाला याबाबत विचारणा केली. तरीही वीजपुरवठा सुरळीत झाला नाही. यामुळे महावितरणच्या कार्यालयाकडे तक्रारींचा ओघ सुरू झाला. ते पाहता त्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी फोन रिसिव्हर उचलून बाजूला ठेवून दिला. त्यामुळे फोन वारंवार एन्गेज असल्याचे सांगितले जात होते. कर्मचाऱ्यांच्या या मुजोर कृत्यामुळे वाडीतील नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. सध्या पावसाचे दिवस आहे. त्यातच अनेक भागात नगर परिषदेने साफसफाई केलेली नाही. परिणामी डासांची संख्या वाढलेली आहे. त्यातच रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. वीजपुरवठा खंडित होणे ही वाडीवासीयांसाठी नित्याचीच बाब झाली आहे. त्यातही ही समस्या पावसाळ्यात खूपच जास्त प्रमाणात उद्भवते. रात्री - मध्यरात्री वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे नागरिकांना उकाडा सहन केल्याशिवाय पर्याय नसतो. रात्रीच्या वेळी कार्यालयात फोन केला तरीही कार्यालयातून काहीही प्रतिसाद मिळत नाही. (जिल्हा प्रतिनिधी)