ठळक मुद्देलघुपट, माहितीपट, व्हिडीओ क्लिप, चित्रफित पाहता येणार
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वृक्ष लागवड मोहिमेचे लघुपट, माहितीपट, व्हिडीओ क्लिप तसेच वृक्षारोपणाबाबत तयार केलेल्या चित्रफित प्रत्येक नागरिकांना पाहता यावी, यासाठी वन विभागाच्या वतीने यू-ट्यूब या संकेतस्थळावर ‘महाफॉरेस्ट ग्रीनट्यूब’ चॅनल सुरू केले आहे. शासनाच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत १३ कोटी वृक्ष लागवडीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक नागरिक हरित महाराष्ट्र चळवळीत सहभागी होऊन वनसंपदा वाढविण्यास सहकार्य करीत आहे. व्यापक प्रमाणात राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाची माहिती जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी वनविभागाद्वारे ‘महाफॉरेस्ट ग्रीनट्यूब’ चॅनल सुरू केले आहे.