लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाचे स्थानिकांना रोजगार देण्याचे धोरण आहे. परंतु महाजनकोने कोल वॉश करण्याच्या कामात विदर्भातील व्यावसायिकांना डावलून महाराष्ट्राबाहेरील कंपन्यांना काम दिले आहे. यामुळे विदर्भातील तरुण इंजिनिअर व बेरोजगारांवर अन्याय केला असून रोजगारांच्या संधीवर गारपीट आणली आहे, असा आरोप जय जवान, जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.महाराष्ट्रात वीज निर्मिती करणाऱ्या राज्य शासनाच्या महाजनको या कंपनीकडून वीज निर्मितीसाठी डब्ल्यू.सी.एल.,एस.ई.सी.एल.(कोरबा छत्तीसगड) व एम.सी.एल.(संबलपूर-ओडिशा) येथून कोळसा विकत घेतला जातो. महाजनको यांच्याकडून दरवर्षी सुमारे २२ मिलियन मेट्रिक टन कोळसा विकत घेते. २०११ पूर्वी महाजनको वीज निर्मितीसाठी न धुतलेला कोळसा वापरत होती. परंतु पर्यावरण विभागाने निर्बंध घातल्याने वॉशरीजचा कोळसा वापरण्याचा निर्णय घेतला. यासाठी नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्र स्टेट मायनिंग कार्पोरेशन यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार या कंपनीने वॉशरीजमधील कोळसा पुरववठ्यासाठी निविदा मागविल्या होत्या. यासाठी एम.एस.एम.सी. च्या मुख्यालयात प्री -बिडिंग मिटींग घेण्यात आली. यामध्ये ११ कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता. परंतु निविदेतील जाचक अटी व शर्थीमुळे फक्त दोन कंपन्यांनी निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला. दरम्यान उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार टेक्निकल व फायनान्शियल बीड उघडण्यात आले. यात विदर्भातील व्यावसायिकांना डावलून महाराष्ट्राच्या बाहेरील कंपन्यांना काम देण्यात आल्याचा आरोप पवार यांनी केला. महाजनकोने वॉश कोळसा वापरण्यासाठी डिझाईन केले आहे का, यामुळे वीज निर्मितीत वाढ झाली आहे का, पर्यावरण विभागाने वॉशरिजची परवानगी देताना पाणी वापराचा अभ्यास केला आहे का, जगात पाण्याचा वापर न करता ळसा स्वच्छ केला जातो. असा करार का करण्यात आला नाही. वॉश कोळशामुळे वीज निर्मितीत काही प्रमाणात वाढ होत असली तरी त्यामुळे आर्थिक भूर्दंड हा सर्वसामान्य नागरिकांनाच सोसावा लागणार आहे. सर्वबाबींचा विचार करता कोलवॉशचा निर्णय चुकीचा आहे. याकडे राज्यकर्त्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी प्रशांत पवार यांनी केली. यावेळी विजय शिंदे,अरुण वनकर, मिलींद महादेवकर, शेखर शिरभाते, हरीष नायडू , रवींद्र इटकेलवार आदी उपस्थित होते.
महाजनकोचा विदर्भावर अन्याय : प्रशांत पवार यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 9:48 PM
राज्य शासनाचे स्थानिकांना रोजगार देण्याचे धोरण आहे. परंतु महाजनकोने कोल वॉश करण्याच्या कामात विदर्भातील व्यावसायिकांना डावलून महाराष्ट्राबाहेरील कंपन्यांना काम दिले आहे.
ठळक मुद्देरोजगाराच्या संधीवर गारपीट