शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

महामेट्रो करणार नागपुरातील पाच मार्केटचा पुनर्विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 10:18 PM

कॉटन मार्के टसह खोवा मार्के ट व संत्रा मार्के ट, बर्डी येथील नेताजी फूल मार्के ट आणि गड्डीगोदाम स्थित गोलबाजार या जागेचा पुनर्विकास करण्याची जबाबदारी महामेट्रोला देण्यात आली आहे. महामेट्रो आणि महापालिका यांच्यात याबाबतचा सामंजस्य करार मंगळवारी करण्यात आला. महाल येथील टाऊन हॉल येथे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित आणि महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी स्वाक्षरी केली.

ठळक मुद्देमहामेट्रो आणि महापालिका यांच्यात सामंजस्य करार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कॉटन मार्के टसह खोवा मार्के ट व संत्रा मार्के ट, बर्डी येथील नेताजी फूल मार्के ट आणि गड्डीगोदाम स्थित गोलबाजार या जागेचा पुनर्विकास करण्याची जबाबदारी महामेट्रोला देण्यात आली आहे. महामेट्रो आणि महापालिका यांच्यात याबाबतचा सामंजस्य करार मंगळवारी करण्यात आला. महाल येथील टाऊन हॉल येथे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित आणि महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी स्वाक्षरी केली.महामेट्रो नागपूर प्रकल्पाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण होत असल्याने आता महा मेट्रोकडे शहरातील इतर विकासकामांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. १९०१ साली उभारण्यात आलेल्या कॉटन मार्केट इमारतीचे ३०,००० रुपये खर्च करून १९२८ साली बांधकाम करण्यात आलेले होते. त्यानंतर १९६९ साली साली पुन:बांधकाम झालेल्या सध्याच्या कॉटन मार्केटसाठी सुमारे ७०,४२४.६३ चौरस मीटर, नेताजी मार्केटसाठी ७,३९३ .४० चौरस मीटर व १९३१ साली उभारण्यात आलेल्या गड्डीगोदाम स्थित गोलबाजारसाठी ६,२८९.९० चौरस मीटर इतक्या जागेवर व्यावसायिक प्रगतीसाठी विविध विकास कामे महामेट्रो करणार आहे.करारानुसार इमारतीचा विस्तारित आराखडा, इमारत बांधकामाची योजना, वित्तीय योजना, दुकानांचे बांधकाम व इतर संबंधित सर्व कामाची जबाबदारी महामेट्रोला देण्यात आली आहे. या सर्व कार्यासाठी संबंधित जागा अटी व शर्तीवर महामेट्रोला हस्तांतरित करण्यात आली आहे. या जागेचे स्वामित्व महानगरपालिकेकडे असेल व विकास कार्य पूर्ण होताच महामेट्रो प्रकल्प महापालिकेला हस्तांतरित करणार आहे.यापूर्वी महामेट्रो आणि महापालिका यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार ‘लंडन स्ट्रीट’च्या धर्तीवर शहरात तयार होणाऱ्या ‘ऑरेंज सिटी स्ट्रीट’च्या प्रस्तावित जागेवर महामेट्रो आकर्षक मेट्रो मॉल तयार करणार आहे. या प्रकल्पाची संपूर्ण रूपरेखा तयार होण्यापूर्वीच पुन्हा अतिरिक्त कामाची जबाबदारी महामेट्रोला देण्यात आली आहे. सर्व प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करणार असल्याचा विश्वास महाोट्रोच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :NAGPUR METRO RAIL CORPORATION LIMITEDनागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका