शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

महामानवाला अ भि वा द न

By admin | Published: April 15, 2017 2:09 AM

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती शुक्रवारी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

जय भीमच्या घोषणांनी आसमंत निनादला दीक्षाभूमी, संविधान चौक आंबेडकरी अनुयायांनी फुलले नागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती शुक्रवारी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विविध सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि शैक्षणिक संघटनांसह आंबेडकरी अनुयायांनी दीक्षाभूमी व संविधान चौक येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. यावेळी शहरातील विविध भागातून ढोल ताशांच्या गजरात रॅली काढण्यात आली.या रॅलीचा समारोप दीक्षाभूमी आणि संविधान चौकात झाला. शहरात सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. एकूणच जय भीमच्या घोषणांनी आसमंत निनादला होता. दीक्षाभूमी येथे सकाळपासूनच आंबेडकरी-बौद्ध अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन अभिवादन करण्यास सुरुवात केली. रात्रीपर्यंत ते सुरूच होते. महापालिका भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी महापालिका मुख्यालयात कार्यक्रमात आयोजित करण्यात आला. महापौर नंदा जिचकार यांनी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्ष नेता संजय महाकाळकर, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, उपायुक्त रवींद्र देवतळे आदी उपस्थित होते. नागपूर शहर काँग्रेस कमिटी नागपूर शहर काँग्रेस कमिटीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पदयात्रा काढण्यात आली होती. शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेत माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, यादवराव देवगडे, विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर, डॉ. गजराज हटेवार, बंडोपंत टेंभुर्णे, रामगोविंद खोब्रागडे यांच्याहस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रसंगी अ‍ॅड. अक्षय समर्थ, देवा उसरे, सतीश तारेकर, अनवर खान पठाण, नरेश गावंडे, मेहबूब खान, खुशाल इंगोले, मालिनी खोब्रागडे, डॉ. प्रकाश ढगे, विवेक निकोसे, दीनानाथ खरबीकर आदी उपस्थित होते. मागासवर्गीय/इतर मागासवर्गीय पाणीपुरवठा कर्मचारी संघटना संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती संविधान चौकात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजू मुक्कावार यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी शेषराव हाडके, विजय हिवसे, राजेश हाडके, दीपक धोटे, विश्वास वानखेडे, प्रशांत दासरवार, मनोज चिंचोळकर, संदीप रोडे, सुभाष तांबुलकर, सुरेश दुबे, चंद्रशेखर घोडे, प्रभाकर वानखेडे, बाबा कुमरे, जगदीश जाधव, अरुण रंगारी, रामेश्वर वघारे, दिलीप काटोले, प्रभाकर कोडापे, अनिल झोडापे, विद्याधर सोंडोले, विनायक भातकुलकर, भोजराज शिंगाडे, विलास वेलफुलवार, श्याम माहुलकर, अरुण मसराम, भीमराव वाघमारे, सिद्धार्थ गेडाम उपस्थित होते. संचालन राजेश हाडके यांनी केले. आभार दीपक धोटे यांनी मानले. महाराष्ट्र राज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र संघ संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती साजरी करण्यात आली. संघटनेचे सरचिटणीस योगेश वागदे यांच्या नेतृत्वात संविधान चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भूषण दडवे, रूपराव राऊत, डॉ. महादेव नगराळे, बंडोपंत टेंभुर्णे, ममता गेडाम, माया घोरपडे, मंदा वैरागडे आदी उपस्थित होते. भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन परिषद संविधान चौकात भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन परिषदेच्या वतीने बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी राजेश रंगारी, श्याम चौधरी, अरविंद ढेंगरे, सुरेश गेडाम, मीनाक्षी धडाडे, प्रदीप अहिरे, मायकल रंगारी, इकेश नेवारे, मिनेश गाडे, राजेश उईके, माधुरी रंगारी, फर्जिया शेख उपस्थित होत्या. सामाजिक विकास केंद्र केंद्रातर्फे संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नंदकिशोर महतो, बाबूराव वामन, उमेश पिंपरे, सुनील तुरकेल, राजेंद्र हजारे, राजेश हाथीबेड, हरीश नक्के, किशोर बिर्ला, प्रदीप मांजरे, रंजित गौरे, राजकुमार खरे, मिलन तांबे उपस्थित होते. अ.भा. महात्मा फुले समता परिषद परिषदेच्या वतीने संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी महानगर अध्यक्ष श्याम चौधरी, विजय नाडेकर, राजेश रंगारी, विजय शेंडे, अरविंद ढेंगरे, सुरेश गेडाम, चरणजीतसिंग चौधरी, संजय शेवाळे, प्रजय रामटेके, आशीर्वाद आमगावकर, राजेश चौधरी, सुरेश गजभिये, दीपक पाटील, रविशंकर बागडे, माधुरी रंगारी, शैलेश मानकर, नरेंद्र आगलावे उपस्थित होते. नागपुरे विद्यालय नागपुरे ले-आऊट येथील नागपुरे विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला मुख्याध्यापक सुरेश देशमुख, पर्यवेक्षक रूपेंद्र बसेशंकर, राजू बालकोटे, सुनीता देशमुख उपस्थित होत्या. यावेळी निबंध, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. संचालन रंजना निंबलवार यांनी केले. आभार अर्चना लेंडे यांनी मानले. नागपूर शहर काँग्रेस सेवादल सेवादलाचे शहर मुख्य संघटक रामगोविंद खोब्रागडे यांनी संविधान चौकातील