मनपाचा अर्थसंकल्प १९६५.१२ क ोटींचानागपूर : तिजोरीत पैसा नसल्याने विकास कामे रखडलेली आहेत. कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देताना अडचणी येत आहेत. उत्पन्नाच्या साधनात फारशी वाढ होईल अशी परिस्थिती नाही. असे असतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी अनुदानाच्या बळावर कोटीची उड्डाणे घेत महापालिकेचा सन २०१५-१६ या वर्षाचा १९६५.१२ कोटीचा अर्थसंकल्प सोमवारी विशेष सभेत सादर केला.गेल्या वित्त वर्षात मनपाच्या तिजोरीत एक हजार कोटीच्या असपास महसूल गोळा झाला. या उत्पन्नाचा विचार करता याच्या दुप्पट रकमेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्था कर आॅगस्ट महिन्यापासून रद्द होणार असला तरी या बदल्यात मनपाला सरकारकडून ४५० कोटीचे अनुदान गृहीत धरण्यात आले आहे. केंद्र व राज्य सरकारकडून ५३४.६१ कोटीचे अनुदान अपेक्षित आहे. तसेच नगररचना विभागाकडून प्रथमच १४४ कोटी तर लोककर्म विभागाच्या माध्यमातून तब्बल २०० कोटी गृहीत धरण्यात आल्याने अर्थसंकल्पाने हनुमान उडी मारली आहे.मर्यादित उत्पन्नाची साधने व एलबीटी समाप्त होणार असल्याने आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी २०१५-१६ या वर्षाचा १२९४.६७ कोटीचा वास्तव अर्थसंकल्प सादर केला होता. यात २०० ते ३०० कोटीची वाढ केली जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु सिंगारे यांना कें द्रात व राज्यात भाजपची सत्ता असल्याने अनुदान मिळणार असल्याची खात्री असल्याने ६७०.४५ कोटीने अधिक रकमेचा अर्थसंकल्प सादर केला. गेल्या वर्षी तत्कालीन स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी १६४५.५५ कोटीचा अर्थसंकल्प सादर केला होता. प्रत्यक्षात इतके उत्पन्न झाले नव्हते. नावीन्यपूर्ण कल्पनेतून नागरी सुविधा अंतर्गत आदर्श वस्ती सुधार व परिसर पालकत्व योजना वगळता अर्थसंकल्पात कोणत्याही स्वरूपाच्या नवीन घोषणा करण्यात आलेल्या नाही. जुन्याच योजनांचा प्रामुख्याने समावेश आहे. कर वगळता ९ विभागाकडून ५८२.५४ कोटीचे उत्पन्न अपेक्षित आहे. सविस्तर : पान/७उत्पन्नाची बाजूविभाग उत्पन्न(कोटीत)एलबीटी ४५०.००संपत्तीकर २७०.८५पाणीकर १५०.००नगररचना १४४.१०बाजार वसुली ६.५५स्थावर विभाग १४.१०अग्निशमन १२.७५आरोग्य ३.६६लोककर्म (बीओटी) २००विद्युत विभाग २६.००हॉटमिक्स प्लान्ट १५.३०महसुली अनुदान १५१.६६इतर विभागाकडून उत्पन्न ३१.२८भांडवली अनुदान ३८२.९५खर्चाची बाजू विभाग खर्च (कोटीत)आस्थापना ३८७.६९प्रशासकीय ४४.७२प्रवर्तन, दुरुस्ती ३०८.६२विकास योजना ८७.३९भांडवली खर्च ७९.४९भांडवली अनुदान २०६.३५कर्ज परतफेड ५२.३०अशंदान, अनुदान व्यय ४०.०५निरपेक्ष व ठेवी व्यय ३४.८०कार्यात्मक अग्रिम व्यय ८.०५
आकड्यांचा ‘महा’पूर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2015 2:09 AM