लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने स्थिर निगराणी पथकाकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीदरम्यान नागपूर जिल्ह्यातील विविध मतदारसंघात नऊ लाखांच्या मुद्देमालासह एक कोटींच्या वर रोख रक्कम जप्त करण्यात आली.सावनेर विधानसभा मतदारसंघात २३ सप्टेंबर रोजी ९ लाख नऊ हजार १४४ रुपये किंमतीचे ३२.४० किलो चांदीच्या वस्तू खुसार्पार चेकपोस्टवर चिराग जैन यांच्याकडून जप्त करण्यात आले होते. सावनेर विधानसभा मतदारसंघातच खुसार्पार चेकपोस्टवर २८ सप्टेंबर रोजी बरुण चौहान यांच्याकडून पाच लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. हिंगणा विधानसभामतदार संघांतर्गत बुटीबोरी वाय-प्वाईंटवर नामदेव राजकुमार मिरानी यांच्याकडून १ ऑक्टोबर रोजी दोन लाख ८७ हजार ७७० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.नागपूर शहरातील नागपूर मध्य मतदारसंघात १४ ऑक्टोबर रोजी सुरेश बारस्कर यांच्याकडून २५ लाख रुपयांची रोख रक्कम तपासणीदरम्यान जप्त करण्यात आली. त्याच दिवशी हुडको कॉलनी सदर येथील प्रकाश बन्सोड यांच्याकडून ७१ लाख ८० हजार ४०९ रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. नागपूर पूर्व मतदारसंघात ११ ऑक्टोबर रोजी दोन लाख ३८ हजार ३०० रुपयांची रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती खर्च सनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी हेमंत ठाकरे यांनी दिली.
Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात १ कोटीवर रोख रक्कम जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 20:57 IST
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने स्थिर निगराणी पथकाकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीदरम्यान नागपूर जिल्ह्यातील विविध मतदारसंघात नऊ लाखांच्या मुद्देमालासह एक कोटींच्या वर रोख रक्कम जप्त करण्यात आली.
Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात १ कोटीवर रोख रक्कम जप्त
ठळक मुद्देनिवडणूक काळात आठ ठिकाणी कारवाई