लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मतमोजणीदरम्यान शांतता राखण्यासाठी अधिकाऱ्यांसह २५०० पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. मतमोजणीदरम्यान आणि त्यानंतर असामाजिक तत्त्वांनी गोंधळ घालण्याच्या शंकेमुळे पोलिसांनी गुरुवारी कडक बंदोबस्त लावला आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी केंद्रावर तीन अप्पर आयुक्त, नऊ उपायुक्त, १४ सहायक आयुक्त, ७६ निरीक्षक, १३५ सहायक निरीक्षक, १५६८ पुरुष आणि १७९ महिला पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. त्यांच्या मदतीसाठी २०० सीआरपीएफ, १०० एसआरपीएफ तसेच ४०० होमगार्ड राहणार आहेत. याशिवाय नियंत्रण कक्षात अतिरिक्त पोलीस आणि शीघ्र कृती दल तैनात करण्यात आले आहे. निवडणुकीचा निकाल लागताच शहरात उत्सव सुरू होणार असल्यामुळे कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात मतमोजणीसाठी २५०० पोलीस तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 10:50 PM