लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नागपूर जिल्ह्यातील १२ ही विधानसभा मतदार संघातून एकूण ३२ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात एकूण १४६ उमेदवार राहिले आहेत. बहुतांश बंडखोरांनी मैदान सोडले असले तरी, काही बंडखोरांनी मात्र आपले आव्हान कायम ठेवले आहे.एकूण २०५ उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. ५ ऑक्टोबर रोजी झालेल्या छाननी प्रक्रियेमध्ये यापैकी २८ उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे १७८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. आज शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील १२ ही विधानसभा मतदार संघातून एकूण ३२ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे निवडणुकीच्या मैदानात १७८ उमेदवार उरले आहेत. मध्य नागपुरातून काँग्रेसचे बंडखोर नगरसेवक रमेश पुणेकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. माजी आमदर यशवंत बाजीराव, विनोद इंगोले व प्रफुल्ल बोकडे यांनीही माघार घेतली. त्याचप्रकारे पश्चिम नागपुरातून तीन उमेदवार प्रमोद नरड, यशवंत तेलंग व वीरसेन बारसे यांनी उमेदवारी मागे घेतली. दक्षिण नागपुरातून बंडखोरी करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव योगेश कुंभलकर व माजी नगरसेवक राजू नागुलवारसह मंगलमूर्ती सोनकुसरे यांनीही आपली उमेदवारी मागे घेतली. नागुलवार हे भाजपमध्ये जाण्याचीही चर्चा आहे. पूर्व नागपुरातूनही राष्ट्रवादी काँग्रेसला दिलासा मिळाला. त्यांचे एकमेव नगरसेवक दुनेश्वर पेठे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. याच मतदार संघातून अपक्ष नगरसेविका आभा पांडे, सुनील इंगळे व राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीचे रोशन साहू यांनीही आपली उमेदवारी मागे घेतली. उत्तर नागपुरातून बंडखोरी करणारे काँग्रेसचे नगरसेवक मनोज सांगोळे यांच्यासह महेंद्र भांगे व विशाल गोंडाणे यांनीही माघार घेतली.दुसरीकडे ग्रामीण भागातील काटोलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या नावाचा उमेदवार अनिल नीळकंठ देशमुख यांनीही आपली उमेदवारी मागे घेतली. सावनेरमधून भाजप नेते नितीन राठी, खेमाजी बारापात्रे व अनुजा केदार यांनीही आपली उमेदवारी मागे घेतली. उमरेडमधील शिवसेनेचे बंडखोर देवीदास धारगावे यांच्यासह नत्थू लोखंडे, राजेंद्र मेश्राम, विलास झोडापे, हिंगण्यामधून राजेंद्र कांबळे, रामटेकमधून काँग्रेस नेते चंद्रपाल चौकसे यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.शिवसेना-भाजपात बंडखोरीयुतीअंतर्गत एकही जागा न मिळाल्याने शिवसेनेला जिल्ह्यात बंडाचा सामना करावा लागला. रामटेकमध्ये विजयाची हॅट्ट्रिक लावणारे माजी आमदार आशिष जयस्वाल यांनी बंडखोरी केली असून, ते मैदानात दटून आहेत. त्याचप्रकारे दक्षिण नागपुरात शिवसेनेचे उमेदवार राहिलेले माजी उपमहापौर किशोर कुमेरिया हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विशेष म्हणजे जेव्हा कुमेरिया हे युतीचे उमेदवार होते तेव्हा मोहन मते यांनी बंडखोरी केली होती. दक्षिण नागपुरात भाजपला बंडखोराचा सामना करावा लागला होता. माजी उपमहापौर सतीश होले हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दक्षिण नागपुरात काँग्रेसलाही प्रमोद मानमोडे यांच्या बंडखोरीचा सामना करावा लागत आहे.नेत्यांना करावी लागली मेहनतबंडखोरांना शांत करण्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना चांगलीच मेहनत करावी लागली. उत्तर नागपुरातील बंडखोरी शांत करण्यासाठी काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांना स्वत: हस्तक्षेप करावा लागल्याची माहिती आहे. काँग्रेसला मध्य नागपुरातील बंडखोरीही शांत करण्यात यश आले. त्याचप्रकारे शिवसेना व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीसुद्धा बंडखोरांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात एकीकडे काँग्रेसला दिलासा मिळाला तर दक्षिणमधील बंडखोरी नियंत्रणात आणण्यात भाजप-शिवसेनेला यश आले नाही.मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील उमेदवारांनी घेतली नाही माघारजिल्ह्यातील सर्व विधानसभेतील एकूण ३२ उमेदवारांनी सोमवारी मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण-पश्चिम या विधानसभा मतदार संघातील एकाही उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला नाही. जिल्ह्यातील सर्वाधिक २० उमेदवार नागपूर दक्षिण-पश्चिम मतदार संघात आहेत. तर नागपूर पूर्व व सावनेरमध्ये सर्वात कमी ८ उमेदवार रिंगणात अहेत. त्यानंतर नागपूर दक्षिणमध्ये १७, काटोलमध्ये १०, सावनेर ८, हिंगणा १२, उमरेड ११, नागपूर मध्य १३, नागपूर पश्चिम १२, नागपूर उत्तर १४, कामठी १२ व रामटेकमध्ये ९ उमेदवार रिंगणात कायम आहेत.
असे आहेत उमेदवार
मतदार संघ : नागपूर पूर्व अनु.क्र. उमेदवार पक्ष १) कृष्णा खोपडे भाजप २) पुरुषोत्तम हजारे काँग्रेस ३) सागर लोखंडे बसपा ४) मंगलमूर्ती सोनटक्के वंचित बहुजन आघाडी ५) गोपालकुमार कश्यप छत्तीसगड स्वाभिमान मंच ६) चंद्र्रकांत गेडाम अपक्ष ७) अमोल इटनकर अपक्ष ८) विलास चरडे अपक्ष मतदार संघ : नागपूर दक्षिण अनु.क्र. उमेदवार पक्ष
१) मोहन मते भाजप २) गिरीश पांडव काँग्रेस ३) शंकर थुल बसपा ४) रमेश पिसे वंचित बहुजन आघाडी ५) प्रमोद मानमोडे अपक्ष ६) अॅड. त्रिशील खोब्रागडे आंबडकराईट्स पार्टी ऑफ इंडिया ७) आशिष श्रीवास्तव पिछडा समाज पार्टी ८) विठ्ठल गायकवाड अपक्ष ९) जॉनी रायबोरडे भारतीय मानवाधिकार फेडरल पार्टी १०) किशोर कुमेरिया अपक्ष ११) श्रीधर साळवे अपक्ष१२ ) राजश्री इंगळे अपक्ष १३) सतीश होले अपक्ष १४) उदय बोरकर बहुजन महापार्टी १५) राहुल हरडे अपक्ष १६ ) दिलीप यादव अपक्ष १७) प्रमोद कापसे अपक्ष
मतदार संघ : नागपूर दक्षिण-पश्चिम
अनु. क्र. उमेदवार पक्ष १) देवेंद्र फडणवीस भाजप २) डॉ. आशिष देशमुख काँग्रेस ३) विवेक हाडके बसपा ४) रवींद्र्र शेंडे वंचित बहुजन आघाडी ५) कांतिलाल पखिडे बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी ६) संजीव तिरपुडे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (खोब्रागडे ७) राजू चौहान बळीराज पार्टी ८) अरुण निटूरे राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी ९) अंबादास लोखंडे बहुजन मुक्ती पार्टी १०) प्रभाकर सातपैसे अपक्ष ११) दीपक मस्के अपक्ष १२) शैलेश मानकर अपक्ष १३) प्रशांत पवार अपक्ष १४) अॅड. पंकज शंभरकर अपक्ष १५) धर्मशीला भारद्वाज अपक्ष १६) ज्योत्स्ना अडकने अपक्ष १७) रिना सिंग - अपक्ष १८) योगेश ठाकरे सीपीआय एमए१९) अमोल हाडके आम आदमी पार्टी२०) सचिन पाटील महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी मतदार संघ : नागपूर मध्य
अनु.क्र. उमेदवार पक्ष
१) विकास कुंभारे भाजप २) ऋषीकेश ऊर्फ बंटी शेळके काँग्रेस ३) धर्मेंद्र मंडलिक बसपा ४) कमलेश भगतकर वंचित बहुजन आघाडी ५) अब्दुल चारिक एआयएमआयएम ६) नंदा बोकडे राष्ट्रीय जनसंभावना पार्टी७) मो. शकुर खान मायनॉरिटीज डेमोक्रेटिक पार्टी ८) भोजराज निमजे पिछडा समाज पार्टी ९) किशोर समुद्रे अपक्ष १०) कमल गौर अपक्ष ११) राहुल गौर अपक्ष १२) सचिन वाघाडे अपक्ष १३) संजय डोके अपक्ष
मतदारसंघ : उत्तर नागपूर अनु. क्र. उमेदवार पक्ष
१) डॉ. मिलिंद माने भाजप २) डॉ. नितीन राऊत काँग्रेस ३) सुरेश साखरे बसपा ४) विनय भांगे वंचित बहुजन आघाडी५) अमन रामटेके मायनॉरिटीज डेमोक्रेटिक पार्टी६) जितेश रामटेके अ.भा. रिपब्लिकन पक्ष ७) कीर्ती डोंगरे एआयएमआयएम ८) यामिनी देवकर राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी ९) सतीश शेंडे अपक्ष १०) कैलाश वाघमारे अपक्ष ११) शिवप्रसाद गोहिया अपक्ष १२) कार्तिक डोके विश्व हिंदू जनसत्ता पार्टी१३) विजया बागडे आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडिया१४) कैलास वाघमारे अपक्ष १५) अर्चना उके राष्ट्रीय जनसंभावना पार्टी
मतदार संघ : नागपूर पश्चिम
अनु. क्र. उमेदवार पक्ष १) सुधाकर देशमुख - भाजप २) अफजल फारुख - बसपा ३) रामभाऊ भलावी - पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक) ४) विनोद रंगारी - बीआरएसपी ५) नीलेश डोके - अपक्ष ६) राजीव सिंग - अपक्ष ७) बबिता अवस्थी - अपक्ष८) विजय खंडाळे - अपक्ष९) मनोज सिंग - अपक्ष १०) योगेश गजभिये - अपक्ष११) मोनाली भलावी - अपक्ष १२) विनोद रंगारी - अपक्ष