शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

Maharashtra Assembly Election 2019 : निकालाचा आदला दिवस : नागपुरात भाजपाच्या कार्यालयात धामधूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 11:51 PM

निकालाच्या आदल्या दिवशी विजयाचा आत्मविश्वास असलेल्या भाजपच्या कार्यालयात अपेक्षेप्रमाणे उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची धामधूम लागली होती; तर काँग्रेस, राष्ट्रवादी व इतर पक्षांच्या कार्यालयात शांतता दिसून आली.

ठळक मुद्देदिवसभर आढावा बैठका : इतरांच्या उमेदवारांची व्यक्तिगत तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुरुवारी सकाळी ईव्हीएम मशीनची पेटी उघडताच इतक्या दिवसांपासून लागलेली विधानसभा निवडणूक निकालाची प्रतीक्षा संपलेली असेल. मात्र आज निकाल कुणाच्या बाजूने लागेल, प्रचारादरम्यान लावलेले मतदानाचे गणित जुळेल की चुकेल, याच्या अंदाजाने निकालाच्या आदल्या दिवशी मात्र उमेदवारांची चलबिचल वाढली आहे. ही परिस्थिती प्रमुख राजकीय पक्षांच्या कार्यालयातही दिसून आली. विजयाचा आत्मविश्वास असलेल्या भाजपच्या कार्यालयात अपेक्षेप्रमाणे उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची धामधूम लागली होती; तर काँग्रेस, राष्ट्रवादी व इतर पक्षांच्या कार्यालयात शांतता दिसून आली. मात्र या उमेदवारांची मतमोजणीसाठी व्यक्तिगत तयारी चालल्याचे चित्र दिसून आले.मतदानानंतर वेगवेगळ्या वाहिन्यांनी दाखविलेल्या एक्झिट पोलनंतर विजयाची खात्री असलेल्या भाजपच्या कार्यालयात अपेक्षेप्रमाणे लगबग चालली होती. पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारासाठी वैयक्तिकपणे तयार केलेल्या प्रचार कार्यालयात कार्यकर्त्यांनी तयारी चालविली होती; तसेच पक्षाच्या कार्यालयातही मतमोजणीसाठीची तयारी चालली होती. भाजपच्या धंतोली येथील कार्यालयात आदल्या दिवशी पक्षाच्या शहरातील उमेदवारांसोबत प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. भाजपचे विभागीय संघटनमंत्री डॉ. कोठेकर यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या आढावा बैठकीत विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, डॉ. मिलिंद माने, सुधाकर देशमुख, मोहन मते या उमेदवारांसह आमदार प्रा. अनिल सोले, गिरीश व्यास, भाजप शहराध्यक्ष प्रवीण दटके तसेच सहा विधानसभा क्षेत्रातील निवडणूक प्रमुख, प्रभारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. मतदानाचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे प्रवीण दटके यांनी सांगितले. मतमोजणी केंद्राच्या प्रत्येक टेबलसाठी एक एजंट व यांच्या मार्गदर्शनासाठी एक प्रमुख नेमण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. अनिल सोले यांनी, मतमोजणी शांततेत पार पाडण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक मतदार संघाची स्वतंत्र मतमोजणी करणार असून, उमेदवार तेथे हजर राहतील. विजय आमचाच आहे, असा विश्वास व्यक्त करीत त्या केंद्रावरून विजय रॅली निघेल, असे त्यांनी सांगितले. दक्षिण नागपूरचे भाजपा उमेदवार मोहन मते यांच्या प्रचार कार्यालयात दुपारी आढावा बैठक घेण्यात आली व कार्यकर्त्यांना सूचना करण्यात आल्या. प्रत्येक फेरीतील मतांचे आकडे गोळा करणे व ते प्रमुखांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी देण्यात आली असल्याचे येथील एका कार्यकर्त्याने सांगितले. 

दरम्यान, शहर काँग्रेस कमिटीच्या देवडिया भवन कार्यालयात आदल्या दिवशी शांतता होती व गणेशपेठ येथील ग्रामीण कार्यालय बंद असल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीच्या गणेशपेठ येथील कार्यालयात काही कार्यकर्ते हजर होते, मात्र शांतता होती. मात्र या पक्षांच्या उमेदवारांनी वैयक्तिक स्तरावर मतमोजणीसाठी तयारी चालविल्याचे दिसून आले. कार्यकर्त्यांना प्रत्येक फेरीच्या मतमोजणीबाबत सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. पश्चिमचे काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे व दक्षिणचे गिरीश पांडव यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याचे सांगण्यात आले. बसपा व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनीही कार्यकर्त्यांशी चर्चा करून मतदानाचा आढावा घेतल्याची माहिती आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस