शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

Maharashtra Assembly Election 2019 : निवडणूक प्रचारात मुख्यमंत्र्यांच्या 'व्हिजन'चीच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 7:41 PM

राज्यातील विविध भागात स्थानिक मुद्यांसह राज्यपातळीवरील मुद्यांवरदेखील प्रचारात भर देण्यात येत आहे. विशेषत: मुख्यमंत्र्यांच्या ‘व्हिजन’मुळे कार्यान्वित झालेल्या विविध योजनांचा यात प्रामुख्याने समावेश असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देपाच वर्षांतील कामांवरच भर : ‘पोस्टर्स’, ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून पोहोचविली जात आहेत कामे

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला राज्यभरात रंग चढला असून, भाजप-सेना महायुतीतर्फे वास्तविक मुद्यांच्या आधारेच प्रचारावर भर देण्याची योजना ठरविण्यात आली आहे. राज्यातील विविध भागात स्थानिक मुद्यांसह राज्यपातळीवरील मुद्यांवरदेखील प्रचारात भर देण्यात येत आहे. विशेषत: मुख्यमंत्र्यांच्या ‘व्हिजन’मुळे कार्यान्वित झालेल्या विविध योजनांचा यात प्रामुख्याने समावेश असल्याचे दिसून येत आहे.महायुतीचा प्रचार करीत असताना मागील पाच वर्षांतील काम, योजना यांच्यावरच भर देण्यात येत आहे. प्रचारसाहित्यात या योजनांना वरचे स्थान दिले आहे. ‘पोस्टर्स’, ‘होर्डिंग्ज’ यांच्याशिवाय ‘सोशल मीडिया’वरदेखील मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात झालेल्या कामांना प्रमुख स्थान देण्यात येत आहे. ‘लोकमत’ने यासंदर्भात विविध भागातील सामाजिक तज्ज्ञ, निवडणूक तज्ज्ञ तसेच प्रचार यंत्रणा प्रमुखांशी संवाद साधला असता ही बाब प्रामुख्याने दिसून आली.मुख्यमंत्र्यांचा ‘ड्रीमप्रोजेक्ट’ असलेल्या ‘जलयुक्त शिवार’ला मिळालेले यश, पायाभूत सुविधांचा विकास, समृद्धी विकास महामार्ग, औद्योगिक गुंतवणुकीचा वाढलेला ओघ या मुद्यांचा प्रचारात प्रामुख्याने समावेश आहे. सोबतच मागील पाच वर्षांत मुंबई, पुणे, नागपूरमधील मेट्रोच्या कामांनी वेग घेतला. नागपूर मेट्रो तर पाच वर्षांत धावायलादेखील लागली आहे. नागपूर-मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम सुरू झाले. हा देशातील सर्वात मोठा एक्स्प्रेस महामार्ग ठरणार आहे. पुढल्या वर्षीच्या शेवटपर्यंत काम पूर्ण करण्याचा सरकारचा संकल्प आहे. मागील पाच वर्षांत राज्यात विविध माध्यमांतून पावणेचार लाख कोटींहून अधिकची आलेली गुंवतणूक या मुद्यांवर शहरी भागात प्रामुख्याने प्रचार सुरू आहे.दुसरीकडे मागील पाच वर्षांत झालेली सिंचनाची कामे, शेतकऱ्यांना मिळालेली ५० हजार कोटींची कर्जमुक्ती, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत तयार झालेले ३० हजार किलोमीटरहून अधिकचे ग्रामीण रस्ते, राज्यातील १८ हजार गावांमध्ये कार्यान्वित झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या योजना, हागणदारीमुक्त गाव-शहर मोहीम, शिक्षणाचा १६ वरून ३ वर आलेला क्रमांक, जि.प.शाळांमधील वाढलेली पटसंख्या, या मुद्यांवरून ग्रामीण महाराष्ट्रात प्रचार करण्यात येत आहे.‘जलयुक्त शिवार’वर विशेष भरविशेषत: मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून राबविल्या गेलेल्या जलयुक्त शिवार योजनेशी नागरिकदेखील जोडले गेले होते. जवळपास २५ हजार गावांत हे अभियान लोकसहभागाची चळवळ झाली होते, या मुद्यावर तर गावागावांत प्रचार करताना विशेष भर देण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.प्रचारासाठी उमेदवारांना हवेत ‘सीएम’चदरम्यान, प्रचारासाठी आपल्या मतदारसंघात मुख्यमंत्रीच यायला हवेत, असा बहुतांश उमेदवारांचा आग्रह दिसून येत आहे. कमीतकमी पाच मिनिटे तरी मुख्यमंत्र्यांनी यावे, अशी विनंती करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांचे सध्याचे वेळापत्रक व्यस्त सुरू आहे. अशास्थितीत दिवसाला ते पाच किंवा सहा ठिकाणी सभा घेऊ शकत आहे. त्यामुळे प्रचाराचे मुद्दे जनतेपर्यंत नेण्यासाठी प्रभावी नियोजन करण्याच्या सूचनाच उमेदवारांना देण्यात आल्या आहेत.प्रचारातील राज्यपातळीवरील महत्त्वाचे मुद्दे

  • सेवा हमी कायद्याच्या माध्यमातून सेवेचा हक्क
  • शेतीत गुंतवणूक व सुधारणा यात राज्य देशात अव्वल
  • सर्वाधिक पायाभूत सुविधांचे प्रकल्प हाती घेणारे राज्य
  • ‘आपले सरकार’ तसेच महालाभार्थी पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शक कारभार
  • राज्यात २१ हजार ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांची स्थापना
  • सुमारे दीड कोटी सात-बारा ‘ऑनलाईन’
  • ‘सीसीटीएनएस’, ‘सीसीटीव्ही’, सायबर लॅब, फॉरेन्सिक लॅबच्या माध्यमातून तपास यंत्रणेला गती
  • पोलीस दलाचे आधुनिकीकरण, अपराधसिद्धतेत वाढ
  • आदिवासींचे १ लाख ९१ हजारांहून अधिक दावे निकाली, ३३ लाख एकर जमिनीचे हक्क प्रदान
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाच्या कामाला सुरुवात
  •  पाच वर्षांत राज्यात १२ कोटींहून अधिक पर्यटक
  • १०० जलदगती न्यायालयांना मुदतवाढ, २४ नवीन जलदगती न्यायालये
  • १० लाख बोगस शिधापत्रिका रद्द, सर्व रेशन दुकानांत ‘ईपॉस मशीन’
  • नागरी पायाभूत सुविधांचे शंभरहून अधिक प्रकल्प पूर्ण
  • राज्यात ५० कोटी वृक्षांची लागवड, वृक्षआच्छादनात २७३ चौरस कि.मी.ने वाढ
टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChief Ministerमुख्यमंत्री