लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्व राज्याचे लक्ष लागलेल्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कॉंग्रेसने माजी आमदार आशिष देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. गुरुवारी रात्री पक्षाने चौथी यादी जाहीर केली. यात नागपूर शहर व जिल्ह्यातील तीन जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आले.रामटेकमधून कॉग्रेसने उदयसिंह यादव यांना उमेदवारी दिली आहे तर कामठी मतदारसंघातून माजी आमदार सुरेश भोयर यांना तिकीट दिले आहे. माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांना उमेदवारी मिळालेली नाही. दुसरीकडे भाजपनेदेखील सायंकाळी आणखी एक यादी जाहीर केली. यात रामटेकहून विद्यमान आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनाच संधी देण्यात आली आहे. काटोल व कामठी विधानसभा क्षेत्रातील उमेदवार रात्रीपर्यंत जाहीर करण्यात आले नव्हते.
Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांविरोधात कॉंग्रेसकडून देशमुखांना तिकीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2019 11:50 PM
सर्व राज्याचे लक्ष लागलेल्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कॉंग्रेसने माजी आमदार आशिष देशमुख यांना उमेदवारी दिली आहे.
ठळक मुद्देकॉंग्रेसची चौथी यादी जाहीर : रामटेकमधून भाजपकडून रेड्डींना उमेदवारी