शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
3
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
4
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
5
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
6
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
7
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
8
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
9
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
10
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
11
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
12
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
13
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
14
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
15
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
16
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
17
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
18
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
19
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा

Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात निवडणूक यंत्रणा २४ तास राबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 1:09 AM

निवडणुका जाहीर झाल्यापासून तर निकाल जाहीर होईपर्यंतच्या कामातील महत्त्वाचा टप्पा असणारा मतदानाचा दिवस सोमवारी शांततेत पार पडला. मात्र या कामात सकाळी ५ वाजतापासून जुंपलेली यंत्रणा दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजेपर्यंत जागत होती.

ठळक मुद्देपहाटे ४ वाजेपर्यंत कर्मचारी जागले : आता तयारी मतमोजणीची

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणुका जाहीर झाल्यापासून तर निकाल जाहीर होईपर्यंतच्या कामातील महत्त्वाचा टप्पा असणारा मतदानाचा दिवस सोमवारी शांततेत पार पडला. मात्र या कामात सकाळी ५ वाजतापासून जुंपलेली यंत्रणा दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजेपर्यंत जागत होती. त्यानंतरही आज मंगळवारी सकाळी निवडणूक विभागातील काही अधिकारी व कर्मचारी कामावर हजर होते.निवडणुकीचे प्रत्येक काम युद्धपातळीवर केले जाते. त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची व्यवस्था केली जाते. जिल्ह्यात १२ मतदार संघात एकूण ४,४१२ मतदान केंद्र होते. त्यावर २० हजारावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. निवडणूक शाखेत काम करणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांपासून तर प्रत्यक्ष मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मतदानाचा दिवस एक महत्त्वाचा टप्पा असतो. कर्मचाऱ्यांना एक दिवसाआधीच केंद्रावर जाऊन तेथे मुक्काम करावा लागतो. तेथील आवश्यक सोयीसुविधांची पाहणी करावी लागते. मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष मतदान जरी सकाळी ७ वाजतापसून सुरू होत असले तरी प्रत्यक्षात केंद्रावर तैनात असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे काम त्यापूर्वीच दोन तास आधीपासून सुरू होते. ईव्हीएम मशीनची चाचणी, केंद्रावरील विद्युत पुरवठा, आवश्यक सुविधा, सुरक्षा आणि मतदानाची नोंद यासह इतरही कामांचा त्यात समावेश असतो. संपूर्ण दिवसभर ही प्रक्रिया चलते. यादरम्यान कर्मचाऱ्यांना त्यांची जागा सोडता येत नाही. मग केंद्रावर मतदार असो किंवा नसो. मतदानाची वेळ संपल्यावरही जर केंद्रावर मतदार असेल तर जोपर्यंत त्यांचे मतदान होत नाही तोपर्यंत त्यांना थांबणे बंधनकारक असते. मतदानाची प्रक्रिया आटोपल्यानंतर एकूण मतदार, झालेले मतदान, त्याची आकडेवारी, टक्केवारी याचा संपूर्ण तपशील नोंद करून निवडणूक शाखेला पाठविणे, त्यानंतर ईव्हीएम सील करून स्ट्राँग रुमवर घेऊन जाण्याची जबाबदारी केंद्रप्रमुख आणि कर्मचाऱ्यांची असते. स्ट्राँग रुममध्ये एकाच वेळी मतदार संघातील विविध केंद्रांच्या ईव्हीएम जमा होत असल्याने तेथेही मोठी गर्दी उसळते. प्रत्येक केंद्राच्या ईव्हीएम जमा करण्यास बराच वेळ होतो. तोपर्यंत कर्मचाऱ्यांना तेथेच थांबावे लागते. ही संपूर्ण प्रक्रिया पहाटेपर्यंत चालते.सोमवारी मतदान आटोपल्यानंतर कर्मचारी पहाटे ४ वाजता घरी परतले. स्वत: जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शाह, त्यांचा संपूर्ण स्टाफ, निवडणुकीची जबाबदरी सांभाळणारे सर्व उपजिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार आणि कर्मचाऱ्यांनी सोमवारची रात्र जागून काढली. मतदानाच्या कामात सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याच बाबतीत असे घडले असे नाही तर या यंत्रणेवर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांनासुद्धा आयोगाकडे इत्थंभूत तपशील पाठविल्याशिवाय कार्यालय सोडता येत नाही. त्यामुळे सोमवारी रात्री उशिरापर्यंत अधिकारी शहरातील वेगवेगळ्या स्ट्राँगरुमच्या कामकाजावर लक्ष ठेवून होते. त्यानंतर आज सकाळी पुन्हा स्ट्राँग रुमच्या सुरक्षेचे नियोजन, सोमवारी झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी काढणे, विविध प्रकारचे अहवाल आयोगाकडे पाठविणे यात यंत्रणा व्यस्त होती. जिल्हा माहिती विभागही रात्री उशिरापर्यंत राबत होता.अनेक मतदारसंघाचे बूथनिहाय आकडे अद्याप जिल्हा शाखेला प्राप्त झाले नव्हते. ही सर्व प्रक्रिया करतानाच मतमोजणीच्या नियोजनाचेही काम सुरू झाले आहे. गुरुवारी मतमोजणी होणार आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी केले कौतुकदरम्यान, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी मतदान प्रक्रिया शांततेत पर पडली. या कामात तैनात सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदानnagpurनागपूर