Maharashtra Assembly Election 2019 :गिरीश पांडव यांची लक्षवेधी रॅली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 11:37 PM2019-10-19T23:37:08+5:302019-10-19T23:38:34+5:30

दक्षिण नागपूर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भव्य रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. या रॅलीत काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Maharashtra Assembly Election 2019: Girish Pandav's rally attracted attention | Maharashtra Assembly Election 2019 :गिरीश पांडव यांची लक्षवेधी रॅली 

Maharashtra Assembly Election 2019 :गिरीश पांडव यांची लक्षवेधी रॅली 

Next
ठळक मुद्देकाँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश

लोकमत  न्यूज  नेटवर्क 
नागपूर : दक्षिण नागपूर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भव्य रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. या रॅलीत काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गेल्या १० ते १२ दिवस पांडव यांनी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला. गिरीश पांडव यांच्या प्रचार रॅलीला राजाबाक्षा हनुमान मंदिर येथून सुरुवात झाली. रॅली मेडिकल चौक होत सक्करदरा, रमणा मारुती, मोठा ताजबाग, म्हाळगीनगर चौक, जानकीनगर आदी परिसरातून फिरली. रॅलीचा समारोप सभेत झाला. याप्रसंगी अ‍ॅड. अभिजित वंजारी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मतदानाच्या दिवशी कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहून प्रत्येक वस्तीमध्ये, मतदान केंद्रावर बारीक लक्ष ठेवण्याचे आवाहन पांडव यांनी केले. सभेचे संचालन मोरेश्वर जाधव व आभार प्रकाश फुके यांनी मानले. रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, संजय महाकाळकर, नगरसेवक मनोज गावंडे, दीपक कापसे, जयंत लुटे, प्रशांत धवड, सुजाता कोंबाडे, योगेश तिवारी, शेवंता तेलंग, सुभाष भोयर, गजराज हटेवार, किशोर गिद, अशोक राऊत, वासुदेव ढोके, प्रवीण आगरे, दिनेश तराळे, विश्वेश्वर अहिरकर, प्रवीण गवरे, किशोर गजभिये, अशोक काटले, सतीश देऊळकर, च्रंदकांत बडगे, मनोहर तांबुलकर, राजा माहुरे, माधव गावंडे, देवराव डेहनकर, अक्षय हेटे, सुशांत लोखंडे, प्रतीक कोल्हे, रमेश राऊत, शेषराव काटोले, रामभाऊ कावडकर, शिवा अरखेल, लतिफबाबू शेख, हाजी सोहेल पटेल, मो. रशीद अशरफी, शोएब खान, शबनम खान, निसार अली, आसिफ अली, प्रशांत आस्कर, राहुल मुडे, कल्पना जोगे, विद्या सेलुकर आदी सहभागी झाले होते.

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: Girish Pandav's rally attracted attention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.