शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
2
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
3
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस
4
यशस्वीचा ऑस्ट्रेलियातील पहिला डाव अयशस्वी! टीम इंडियाचा युवा हिरो स्टार्कसमोर ठरला झिरो (VIDEO)
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
6
Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल?
7
जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर!
8
याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव
9
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत?
11
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
12
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
13
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
14
टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट
15
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
16
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
17
विशेष लेख: कट्टर उजवे आणि वादग्रस्त - ऑल द प्रेसिडेंट्स मेन....
18
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
19
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
20
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात

Maharashtra Assembly Election 2019 : ग्राऊंड रिपोर्ट : नागपूर पश्चिममध्ये अस्तित्वाची लढाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 11:44 PM

नागपूर पश्चिममध्ये भाजपकडून आ. सुधाकर देशमुख हे विजयाच्या हॅट्ट्रिकसाठी तर काँग्रेसकडून शहर अध्यक्ष विकास ठाकरे हे स्वत:चे अस्तित्व वाचविण्यासाठी रिंगणात आहेत.

ठळक मुद्दे भाजपला बंडखोरीचे ग्रहण : वंचित बहुजन आघाडीचा उमेदवारच नाही

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गेल्या २५ वर्षांपासून भाजपचा झेंडा रोवलेला पश्चिम नागपूरचा गड राखण्यासाठी यावेळी भाजपला खूप परिश्रम घ्यावे लागत आहे. भाजपकडून आ. सुधाकर देशमुख हे विजयाच्या हॅट्ट्रिकसाठी तर काँग्रेसकडून शहर अध्यक्ष विकास ठाकरे हे स्वत:चे अस्तित्व वाचविण्यासाठी रिंगणात आहेत. गेली विधानसभा व लोकसभेत भाजपला आघाडी मिळाली असली तरी दोन टर्म पूर्ण केलेल्या उमेदवारालाच पुन्हा संधी दिल्याने पक्षांतर्गतही नाराजीचे सूर आहेत. हिंदीभाषिक मतांना खिंडार पाडणारी बंडखोरीही झाली आहे. शिवाय वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार रिंगणात नाही. त्यामुळे आजवर एकतर्फी होत असलेला सामना आता काँग्रेसने ‘बराबरी की टक्कर’वर आणून पोहचवला आहे.२०१४ मध्ये भाजपचे सुधाकर देशमुख २६,४०२ मतांनी विजयी झाले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही हे मताधिक्य कायम राहिले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना येथे २७,२५२ मतांची आघाडी मिळाली. भाजपचे पक्ष संघटन येथे बळकट आहे; शिवाय देशमुख बऱ्याच पूर्वीपासून कामाला लागले आहे. भाजपमध्ये उमेदवारीसाठी अखेरच्या क्षणापर्यंत रस्सीखेच झाली. महापौर नंदा जिचकार, नगरसेवक भूषण शिंगणे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दयाशंकर तिवारी, माजी नगरसेवक रमेश चोपडे यांचीही नावे रेसमध्ये होती. यावेळी उमेदवार बदलेल, असा दावा पक्षांतर्गत केला जात असताना प्रत्यक्षात सुधाकर देशमुख यांनाच तिकीट मिळाले. देशमुख यांच्यासाठी भाजपची दिल्ली व राज्यातील नेत्यांची टीम उतरली असली तरी, देशमुख यांना गेल्या १० वर्षांतील ‘अ‍ॅन्टी इनकम्बसी’चा सामना करावा लागत असल्याचे लोकमत चमूच्या पाहणीत दिसून आले.गेल्यावेळीच्या पराभवापासून धडा घेत विकास ठाकरे यांनी यावेळी सावध रणनीती आखली. ते भाजपमध्ये जाणार या अफवेमुळे भाजप कार्यकर्ते उमेदवारी घोषित होईपर्यंत संभ्रमात होते. या काळात भाजप शांत राहिली व प्रचारात मागे पडली. दुसरीकडे ठाकरेंच्या नावाचीच चर्चा झाली. महापालिकेच्या निवडणुकीत तिकीट कटलेल्या, पक्षात पद न मिळालेल्या काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला एकसंघ करण्यात यावेळी ठाकरे यांना यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपली ताकद लावली आहे. यावेळी विकास ठाकरे यांच्याबाबत मतदारांमध्ये काहीशी सहानुभूती पाहायला मिळत आहे.पश्चिम नागपुरात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज छाननीत तांत्रिक कारणामुळे बाद झाला. याचा अप्रत्यक्ष फायदा काँग्रेसला होईल, असे दिसते. लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवाराने ४,३५९ मते घेतली होती.बसपाने येथे अफजल फारुक यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात हत्तीची चाल मंदावली. फक्त ४,५९६ मते मिळाली. यावेळीही बसपाचा फारसा प्रभाव पडेल, असे दिसत नाही. येथे काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली नाही. मात्र, भाजपला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. या भागातील हिंदीभाषिकांचे भाजपला झुकते माप असायचे. मात्र, हिंदीभाषिक चेहरा असलेले मनोज सिंह हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले असून, ते हिंदीभाषिक मतांना ते खिंडार पाडताना दिसत आहेत. उच्च शिक्षित असलेले राजीव रंजन सिंह हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. काही दिवसांपूर्वी रस्त्यावरील खड्यामुळे त्यांचा अपघात झाला असता त्यांनी महापालिका प्रशासनाविरोधात पोलीस तक्रार दाखल केली होती. यामुळे ते चर्चेत आले होते. तसे पाहिले तर देशमुख व ठाकरे हे दोन्ही नेते आपल्या पॉलिटिकल करिअरमध्ये शेवटची निवडणूक लढत आहे. पश्चिममध्ये कुणाचा अस्त होतो, हे निकालानंतर स्पष्ट होईल.एकूण उमेदवार - १२एकूण मतदार : ३,६२,२७४

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nagpur-west-acनागपूर पश्चिम