शहरं
Join us  
Trending Stories
1
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
2
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
3
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
4
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
5
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
6
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
7
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
8
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
9
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
10
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
11
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
12
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
13
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
14
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
15
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
17
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
18
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
19
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
20
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा

Maharashtra Assembly Election 2019 : निकालाच्या दिवशी मतपेटीतून कमळच फुलणार : मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 8:27 PM

निकालांत मतपेटीतून कमळच फुलणार असून महायुतीला राज्यात दोन तृतीयांशहून अधिक जागा मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देदक्षिण-पश्चिम नागपुरातील ‘रोड शो’मध्ये उसळला जनसागर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील पाच वर्षे आम्ही पारदर्शक पद्धतीने काम केले व राज्याला विकासाच्या मार्गावर नेले. २१ तारखेचा दिवस हा कार्यकर्त्यांसाठी लोकशाहीच्या युद्धाचा दिवस आहे. कार्यकर्त्यांनी या दिवशी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान कसे होईल याकडे लक्ष द्यायचे आहे. निकालांत मतपेटीतून कमळच फुलणार असून महायुतीला राज्यात दोन तृतीयांशहून अधिक जागा मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असलेल्या फडणवीस यांनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सकाळी ‘रोड शो’ केला. यावेळी ते बोलत होते.

सकाळी १० च्या सुमारास गोपालनगर येथील माटे चौकातून ‘रोड शो’ला सुरुवात झाली. यावेळी सर्वात अगोदर मुख्यमंत्र्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््याला माल्यार्पण केले व त्यानंतर ‘रोड शो’ची सुरुवात झाली. यावेळी राज्याचे ऊर्जामंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री व भाजपाचे पूर्व विदर्भ प्रचारप्रमुख चंद्रशेखर बावनकुळे, खा.अजय संचेती, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, महापौर नंदा जिचकार, भाजपाचे शहराध्यक्ष प्रवीण दटके, मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जोशी प्रामुख्याने उपस्थित होते. गोपालनगर बाजार, पडोळे चौक, स्वावलंबीनगर या मार्गाने ‘रोड शो’ काढण्यात आला व स्वावलंबीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ््याजवळ याचे समापन झाले. समापनप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ््याला माल्यार्पण केले. यानंतर त्यांनी छोटेखानी भाषण केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच कौल द्यायचा असं महाराष्ट्रानं ठरवलं आहे. भाजप-शिवसेना-रिपाइं, रासप आणि अन्य घटकपक्षांच्या महायुतीला प्रचंड मताधिक्य मिळेल व हा एक नवा विक्रम असेल. आम्ही प्रत्येक समाजाचं चित्र बदलायचं काम केलंय. नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली विदर्भाचे चित्र बदललं आहे. आता पुन्हा जनतेसमोर चाललो आहे. जनतेचं इतकं प्रेम आणि प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद अभूतपूर्व विजय मिळवून देणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २४ तारखेला निकालानंतर जल्लोषासाठी मी येथेच परत येईल, असेदेखील ते म्हणाले.रस्त्यांवर रांगोळ्या, जागोजागी स्वागतदरम्यान, ‘रोड शो’ दरम्यान मार्गावर कार्यकर्त्यांसमवेत नागरिकांनीदेखील रांगोळ्या काढल्या होत्या. जागोजागी नागरिकांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. काही ठिकाणी तर महिलांनी त्यांना ओवाळलेदेखील. आजूबाजूच्या घरांच्या गॅलरी, गच्ची येथे नागरिक मुख्यमंत्र्यांना पाहण्यासाठी एकत्रित आले होते. अनेक ठिकाणी मुख्यमंत्र्यांवर पुष्पवर्षाव करून त्यांचे स्वागत करण्यात आले. ‘रोड शो’ची लांबीच सुमारे एक ते दीड किलोमीटरची होती व दहा हजारांहून अधिक कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.कडेकोट सुरक्षाव्यवस्थामुख्यमंत्र्यांसोबत या ‘रोड शो’मध्ये प्रचंड गर्दी होती व त्यादृष्टीने कडेकोट सुरक्षा व्यवस्थादेखील तैनात करण्यात आली होती. याशिवाय वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी अगोदरच वाहतूक काही काळासाठी वळविली होती. रिंग रोडवर तर वाहनचालकांना त्रास होऊ नये यासाठी त्या पट्ट्यातून ‘रोड शो’ला वेगाने समोर घेण्यात आले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpur-south-west-acनागपूर दक्षिण पश्चिम