शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
3
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत?
4
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
5
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
6
टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट
7
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
8
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
9
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
10
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात
11
शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: जयदेव आपटेंच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब
12
बारावी ११ फेब्रुवारी, दहावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; व्हायरल वेळापत्रकावर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन
13
यूजीसी नेट परीक्षा जानेवारीत होणार; १० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार
14
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
15
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
16
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
17
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
18
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
19
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
20
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती

Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात नऊ हजार पोलीसांचे सुरक्षा कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 9:43 PM

मुख्यमंत्र्यांचे होमटाऊन असलेल्या उपराजधानीतील विधानसभा निवडणुकीचे मतदान शांततेत पार पाडावे म्हणून शहर पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे. निमलष्करी दलाच्या ६०० जवानांसह सुमारे ९ हजार पोलीस मतदानाचा बंदोबस्त सांभाळणार आहेत.

ठळक मुद्देनिमलष्करी दलही मदतीला : रात्रंदिवस गस्त : झोपडपट्ट्यांमध्ये सर्चिंग : संवेदनशील भागावर करडी नजर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्यमंत्र्यांचे होमटाऊन असलेल्या उपराजधानीतील विधानसभा निवडणुकीचे मतदान शांततेत पार पाडावे म्हणून शहर पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे. निमलष्करी दलाच्या ६०० जवानांसह सुमारे ९ हजार पोलीस मतदानाचा बंदोबस्त सांभाळणार आहेत. तर, नागपूर जिल्ह्यातही जोरदार तयारी करण्यात आली असून, निमलष्करी दलासह पाच हजारांवर पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे.विधानसभेच्या मतदानाला अवघे काही तास उरले आहे. निवडणुका जाहीर झाल्यापासूनच पोलिसांनी नियोजनपूर्वक बंदोबस्त केल्यामुळे कोणत्याही प्रकारची मोठी अनुचित घटना घडली नाही. उपराजधानीतील संवदेनशील भागात पोलिसांनी कोम्बिंग, झोपडपट्टी सर्चिंग केले. उपद्रवी पार्श्वभूमी असलेल्यांना पोलीस ठाण्यात आणून आधीच कडक कारवाईचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे किरकोळ अपवाद वगळता उपद्रवी व्यक्तींकडून निवडणुकीच्या कार्यकाळात मोठी अनुुचित घटना घडली नाही. प्रत्यक्ष मतदानाला काही तासांचा अवधी शिल्लक असताना पोलिसांनी शहरात कोण कोणती जबाबदारी पार पाडेल, त्याचे नियोजन केले आहे. शहरातील ८४२ इमारतीत २,६७७ मतदान केंद्रावर विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडणार आहे. कोणत्याच मतदान केंद्रावर गडबड गोंधळ होऊ नये म्हणून शहर पोलीस दलातील तीनपैकी तीनही अतिरिक्त पोलीस आयुक्त, १० उपायुक्त, १४ सहायक आयुक्त, ८४ पोलीस निरीक्षक, २८२ पोलीस उपनिरीक्षक ते सहायक निरीक्षक, ४,८७१ पुरुष तर १२९५ महिला पोलीस कर्मचारी बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळणार आहेत. त्यांच्या मदतीला निमलष्करी दलाच्या (केंद्रीय पोलीस दल) ६ कंपन्या (६०० जवान), महाराष्ट्रातील १००० तर मध्य प्रदेशातील ९०० होमगार्डस् राहणार आहेत. रात्रंदिवस पोलिसांची गस्त राहणार असून, कुठे काही गडबड गोंधळ झाल्यास अवघ्या काही मिनिटात आजूबाजूच्या भागात गस्त करणारे सर्वच्यासर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी तेथे पोहचतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी नियंत्रण कक्षावर विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या सर्वांची मिनिट टू मिनिट रिपोर्टिंग पोलीस आयुक्त आणि सहआयुक्त घेणार आहे.कायदा मोडणाऱ्यांची भीडमुर्वत करणार नाही : पोलीस आयुक्तलोकशाहीच्या उत्सवात खोडा घालू पाहणाºया समाजकंटकांवर वेळीच कडक कारवाई करा, असे निर्देश पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शहर पोलीस दलाला दिले आहे. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाºया कुणाचीही भीडमुर्वत करायची नाही, असेही त्यांनी आपल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सांगितले आहे. तर, नागपुरातील कोणत्याही भागात कसलीही अनुचित घडामोड किंवा संशयास्पद हालचाली दिसत असेल तर पोलिसांना कळवा, असे आवाहन डॉ. उपाध्याय यांनी लोकमतच्या माध्यमातून केले आहे.असा असेल बंदोबस्तअतिरिक्त पोलीस आयुक्त : ३पोलीस उपायुक्त : १०सहायक आयुक्त : १४वरिष्ठ निरीक्षक : ८४पीएसआय ते एपीआय : २८२पोलीस कर्मचारी : ४८७१महिला कर्मचारी : १२९५होमगार्डस् : १९००निलष्करी दलाचे जवान : ६००शहर आणि जिल्ह्यातील कारवाई५०० वर दारू विक्रेत्यांवर कारवाईएक हजार गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाईप्रचार कालावधीत १ कोटी २३ लाख रुपये जप्त

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Policeपोलिस