लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाच्या सावटाखाली सोमवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेला संपूर्ण जिल्ह्यात मतदारांचा संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. २०१४ च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी व काही किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले. २०१४ च्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी काहीशी घटल्याचे दिसून आले. २०१४ मध्ये जिल्ह्यात सरासरी ६१.६५ टक्के मतदान झाले होते. यंदा निवडणूक आयोगाच्या प्राथमिक अंदाजानुसार ५८ ते ५९ टक्के मतदान झाले. सर्वच पक्षांतील दिग्गज नेत्यांसह जिल्ह्यात एकूण १४६ उमेदवारांचे भाग्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद झाले व गुरुवारी निकाल समोर येणार आहे. नागपूर शहराच्या तुलनेत नागपूर ग्रामीणमधील सहा जागांवर मतदानाचा जास्त उत्साह पहायला मिळाला.जिल्ह्यातील सर्वच मतदानकेंद्रांवर सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सुमारास अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा दिसून आल्या. ढगाळलेले वातावरण असल्याने थंडावा होता व अनेकांनी ‘मॉर्निंग वॉक’नंतर लगेच मतदान केले. दुपारच्या सुमारास मतदानाचा उत्साह नक्कीच थोडा कमी झाला. मात्र दुपारनंतर मतदारांची पावले मतदान केंद्रांकडे वळली. विद्यार्थ्यांपासून ते नामवंत व्यक्तीपर्यंत अनेकांनी सकाळीच मतदानासाठी हजेरी लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडक री, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत, सरकार्यवाह भय्याजी जोशी, खा.विकास महात्मे, माजी खासदार अजय संचेती यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला. संपूर्ण जिल्ह्यात ‘ईव्हीएम’ खराब झाल्यासंदर्भातील काही तक्रारी प्राप्त झाल्या. किरकोळ अपवाद वगळता जिल्ह्यात मतदान शांततेत पार पडले.सर्वाधिक उत्साह उमरेडमध्ये
Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात टक्केवारी घटली, धाकधूक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 21:00 IST
२०१४ च्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी काहीशी घटल्याचे दिसून आले. २०१४ मध्ये जिल्ह्यात सरासरी ६१.६५ टक्के मतदान झाले होते. यंदा निवडणूक आयोगाच्या प्राथमिक अंदाजानुसार ५८ ते ५९ टक्के मतदान झाले.
Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात टक्केवारी घटली, धाकधूक वाढली
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांसह नेत्यांचे मतदान : किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत