लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २१ तारखेला मतदान होणार आहे. नियमानुसार ४८ तासांच्या आत निवडणूक प्रचार बंद होतो. त्यामुळे उद्या १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता प्रचारतोफा थंडावतील. दरम्यान राजकीय पक्ष व उमेदवारांच्या दृष्टीने शेवटचे दोन दिवस हेच अतिशय महत्त्वाचे असतात. प्रचार सभा, रॅली, पदयात्रा कॉर्नर मिटींग जास्तीत जास्त करण्यावर भर असतो. परंतु शुक्रवारी सायंकाळी आलेल्या मुसळधार पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली. उद्या शेवटच्या दिवशी प्रचारावर पावसाचे सावट असल्याने उमेदवारांची चिंता वाढली आहे.शुक्रवारी सायंकाळी ४.१५ वाजता अचानक पावसाला सुरुवात झाली. हळूहळू वाढत पाऊस चांगलाच बरसला. विजेच्या कडकडाटांसह तब्बल सव्वा तास पाऊस होता. यामुळे शहरात सायंकाळच्या सुमारास होणाऱ्या अनेक सभांना फटका बसला. उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष व उमेदवार यांचा जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहील.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण-पश्चिम मतदार संघातून निवडणूक लढत आहेत. ते उद्या शेवटच्या दिवशी आपल्या मतदार संघात रोड शो करणार आहेत. माटे चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सकाळी ८.३० वाजता त्यांच्या रोड शो ला सुरुवात होईल. मुख्यमंत्र्यांप्रमाणे सर्वच उमेदवार आपापल्या मतदार संघात शनिवारी शक्तिप्रदर्शन करतील.
Maharashtra Assembly Election 2019 : प्रचारतोफांवर पावसाचे सावट : मुख्यमंत्र्यांसह सर्वच उमेदवार करणार शक्तिप्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 10:09 PM
विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २१ तारखेला मतदान होणार आहे. नियमानुसार ४८ तासांच्या आत निवडणूक प्रचार बंद होतो. त्यामुळे उद्या १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता प्रचारतोफा थंडावतील.
ठळक मुद्दे सायंकाळी ६ नंतर प्रचारबंदी