शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

Maharashtra Assembly Election 2019 : पश्चिम नागपूर :घटलेल्या टक्केवारीत पश्चिमचे गणित : मतदान ४९.६०%

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 3:28 AM

पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघात प्रत्यक्षात ४९.६० टक्केच मतदान झाले. २०१४ च्या तुलनेत २.५४ टक्क्यांची घट झाली.

ठळक मुद्देमतदान शांततेत : सकाळच्या दोन तासात दिसला निरुत्साह, सुशिक्षितांनी दाखविली पाठ

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघात सर्वसमावेशक मतदारांचा समावेश आहे. सिव्हिल लाईन्स, धरमपेठ, रामनगर, फ्रेंडस् कॉलनीसारख्या पॉश वस्त्या बरोबरच येथे गिट्टीखदान, गंगानगर, जगदीशनगर, मकरधोकडा, जाफरनगर, मानकापूर या भागातील मतदार सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बलही आहेत. त्यामुळे मतदानाची टक्केवारी किमान ६० वर जाईल, अशी अपेक्षा होती. मतदानाच्या दिवशी वातावरणही तसेच होते. मात्र प्रत्यक्षात ४९.६० टक्केच मतदान झाले. २०१४ च्या तुलनेत २.५४ टक्क्यांची घट झाली. पहिल्या दोन तासात या मतदार संघात ७.४९ टक्के मतदान झाले. पुढे ११ पर्यंत १० टक्क्यांची वाढ दिसून आली. ११ ते १ च्या दरम्यान केवळ ६ टक्के मतदान झाले. मात्र १ ते ३ च्या दरम्यान १० टक्के मतदान झाले. ३ ते ५ च्या दरम्यान फक्त ५ टक्क्यांनी मतदान वाढले. काही मतदान केंद्रावर ५ नंतरही मतदार दिसून आले. पण एकंदरीतच पश्चिम नागपूर विधानसभेत अपेक्षित असलेली मतदानाची टक्केवारी शक्य होऊ शकली नाही. कमी झालेल्या टक्केवारीचा फटका कुणाला बसणार, हे मतमोजणीच्या दिवशीच कळणार आहे.ईव्हीएममध्ये बिघाड, मतदारांची रांगपश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रात किमान सात मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना घडल्या. यात बहुतांश घटना मतदानाला सुरुवात होतानाच घडल्या. त्यामुळे मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. मतदारांना तास तासभर ताटकळत उभे राहावे लागले. दाभा येथील जयस्वाल हायस्कूलमध्ये बूथ क्रमांक २११ मधील ईव्हीएम सुरूच झाली नव्हती. किमान तासभर मतदारांना ताटकळत बसावे लागले, असे स्थानिक पक्षाच्या प्रतिनिधींचा आरोप होता. स्थानिक प्रतिनिधींनी आक्षेप घेतल्याने मतदानाचा वेळ वाढवून देण्यात आल्याचे सांगितले. येथील ईव्हीएम बदलवून देण्यात आली. त्याचबरोबर मनपा शाळा दाभा येथे सकाळी ८ वाजताच्या सुमारास ईव्हीएम बंद पडली. अवघ्या अर्धा तासातच ईव्हीएम बदलवून देण्यात आली. डागा ले-आऊट येथील सरस्वती प्रा. शाळा येथील बूथ क्रमांक १० ची मशीन बंद पडली. लगेच ईव्हीएम बदलविण्यात आल्याची माहिती आहे. तसेच येथील बूथ क्रमांक ९ ची मशीन २.४५ वाजता बंद पडली. ३.५० वाजता सुरू झाली. तसेच बूथ ८ मध्ये ४ वाजता बंद पडली १५ मिनिटात सुरू झाली. गोरेवाडा रोड बोरगाव येथील गुलाम नबी आझाद शाळेतील बूथवर ९.१५ वाजता ते १०.१० वाजताच्या दरम्यान ईव्हीएम बंद होती. सुरेंद्रगड हिंदी उच्च प्राथमिक शाळा येथील बूथ क्रमांक २ वर ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने नवीन ईव्हीएम लावावी लागली. येथेही अर्धा तास मतदान खोळंबले होते. गोरेवाडा येथील आदिवासी अकादमी उच्च माध्यमिक शाळा येथील बूथ क्रमांक ४ वर २० मिनिट मशीन बंद होती. तसेच बोरगाव येथील सेंट मार्टिन स्कूलमध्ये ईव्हीएम बंद पडल्याने दोन तास मतदार मतदानाच्या प्रतीक्षेत असल्याचे स्थानिक राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी सांगितले. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे १८ तक्रारी ईव्हीएम व व्हीहीपॅट बंद पडल्याच्या आल्या. आलेल्या सर्व ठिकाणची ईव्हीएम बदलविण्यात आली. एक अर्धा तासाचा कालावधी यात गेला. कुठल्याही मतदान केंद्रावर वेळ वाढवून देण्यात आला नाही. फक्त ६ वाजताच्या आत मतदान केंद्राच्या परिसरात जेवढे मतदार होते, त्यांना मतदान करू देण्यात आले.मतदार यादीतील घोळ कायमपश्चिम नागपुरातील अनेक मतदान केंद्रात मतदार यादीत घोळ असल्याचे दिसून आले. अनेकांची नावे मतदार यादीत नव्हते, काहींची नावे दुसऱ्या ठिकाणी होते, काहींचे नावे वेगळे व फोटो वेगळे होते, पती-पत्नीची नावे वेगवेगळ्या मतदार यादीत होते. मतदार यादीतील घोळ कायमच राहिल्यामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचितच राहिले. गिट्टीखदान येथील विनोद नाडे या व्यक्तीचे नाव लोकप्रिय विद्यालयातील बूथच्या मतदार यादीत होते तर परिवारातील अन्य सदस्यांची नावे वेगवेगळ्या ठिकाणी असल्याचे दिसून आले. नवीन व जुन्या मतदान ओळखपत्रामुळेही अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. नवीन कार्ड असलेल्या मतदारांचे नाव यादीत होते, तर जुने कार्ड असलेल्या व्यक्तीचे नावच यादी शोधूनही सापडत नव्हते. याच परिसरात हसन खान यांचे नाव मतदार यादीत हसन पठाण असे असल्यामुळे त्यांना मतदान अधिकाऱ्यांनी मतदानापासून मज्जाव केला होता. परंतु त्यांच्याकडील कागदपत्र बघून त्यांना मतदान करण्याची परवानगी दिली. रियाज अली व नियाज अली हे दोन बंधू आहेत. परंतु, मतदार यादीत त्यांना वडील-मुलगा असे दर्शविण्यात आले. हजारीपहाड परिसरातील मनपा मकरधोकडा हिंदी प्राथमिक शाळा व जगदीशनगर येथील पंडित नेहरू हायस्कूल या मतदान केंद्रावरील मतदार यादीत अनेकांचे नावच नव्हते, तर काहींची नावे अन्य ठिकाणी होते. काहीचे नाव वेगळे व फोटो वेगळ्याच व्यक्तीचे असेही दिसून आले. माजी महापौर माया इवनाते यांचे नाव वेगळ्या तर कुटुंबातील इतर सदस्यांची नावे वेगळ्या यादीत होती. एका ५५ वर्षांच्या महिलेचे वय मतदार यादीत ३ वर्ष होते. गंगानगर येथील राजेश नाईक यांनी मतदान केले. परंतु, त्यांची पत्नी वेनंता नाईकचे नावच यादीत नव्हते. हयात असलेल्या अनेक मतदारांची नावे यादीत दिसत नसताना नामदेव चौधरी व खुशालसिंग बिष्ट यांचे निधन होऊन त्यांचीनावे यादीत कायमच होती. गिट्टीखदान येथील पार्वती नायडू मृत असून, त्यांचे नाव मतदार यादीत होते, परंतु त्यांची मुलगी उषा मेघनाथ नयडू जिवंत असूनही त्यांचे नाव मतदार नव्हते. दाभा परिसरातील अनेक मतदारांची नावे दाभा परिसरातील मतदान केंद्रावर नव्हे तर अन्य ठिकाणच्या मतदान केंद्रावर होती.४एकूण मतदार ३६२२७४४पुरुष १८२९०६४महिला १७९३६३४मतदान केंद्र ३३२

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nagpur-west-acनागपूर पश्चिम