शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
3
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
4
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
5
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
6
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
7
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?
8
सरकारी भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत,सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
10
नवरा बायकोचं भांडण, एका 'OK' नं रेल्वेला ३ कोटींचा फटका; कोर्टातील अजब प्रकरण काय?
11
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
12
Shah Rukh Khan :"जीव वाचवायचा असेल तर कोट्यवधी रुपये द्या, अन्यथा..."; सलमाननंतर शाहरुख खानला धमकी
13
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
14
Girnar Parikrama 2024: 'या' पाच दिवसांतच गिरनारच्या जंगलात मिळतो प्रवेश; जेवढ्या यातना तेवढाच आनंद!
15
शरद पवारांवरील टीका 'मानसपुत्रा'च्या जिव्हारी; निषेध व्यक्त करत वळसे पाटलांनी खोतांना दिला इशारा
16
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
17
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
18
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
19
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
20
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...

Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2024 12:54 PM

Maharashtra Assembly election 2024: विधानसभा निवडणुकीत विदर्भात महाविकास आघाडी की महायुती वरचढ ठरणार, याबद्दल उत्सुकता आहे.

राजेश शेगोकार, नागपूरMaharashtra Election 2024 Vidarbha: राज्याच्या सत्तेचा मार्ग हा विदर्भातून जातो, असे समीकरण गेल्या तीन निवडणुकीपासून रूढ झाले आहे. विभागनिहाय मतदारसंघांचा विचार करता सर्वाधिक ६२ जागा विदर्भात असल्याने या गडावर झेंडा फडकविण्यासाठी मोठी झुंज सुरू झाली आहे. 

नागपूर हे 'भाजपचे शक्तिकेंद्र, विचारपीठ, भाजपाचे राज्यस्तरीय नेतृत्व सध्या याच विभागातून आहे. त्यामुळे विदर्भातील यश भाजपसाठी अतिशय प्रतिष्ठेचे आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराचा शंखनाद करण्यासाठी विदर्भाचीच निवड केली आहे. यावरून विदर्भातील लढाईचे महत्त्व अधोरेखित होते.

भाजपला अनेक ठिकाणी डॅमेज कंट्रोल करण्यात अपयश

पूर्व विदर्भात ३२, तर पश्चिम विदर्भात विधानसभेच्या ३० जागा आहेत. यामध्ये अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या क्षणापर्यंत अनेक मतदारसंघांमधील बंडाळी मोडून काढण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आले असले, तरी शंभर टक्के डॅमेज कंट्रोल झालेले नाही. 

नागपूर मध्य या मतदारसंघात हलबा समाजाच्या स्वतंत्र उमेदवारांच्या स्वतंत्र उमेदवारामुळे हक्काच्या मतदारसंघात आव्हानाची स्थिती आहे. नागपूर पश्चिम, दक्षिण व उत्तर या मतदारसंघांतही भाजपसमोर मोठे आव्हान आहे. सावनेरमध्ये प्रतिष्ठेचा सामना असून राजुरा, ब्रह्मपुरी, चिमूर येथे भाजपसमोर चुरस आहे.

अमरावतीत बंडखोरांमुळे भाजपला डोकेदुखी

अमरावतीच्या तिवसा, अचलपूर, मेळघाट, धामगणगाव रेल्वे आणी मोर्शी या पाच मतदारसंघांत भाजप लढ़त असून मोर्शीत अजित पवार गटाने मैत्रीपूर्ण लढतीची स्थिती निर्माण केली आहे. अमरावती, बडनेरा मतदारसंघांत भाजप बंडखोरांना थांबविता आलेले नाही.

भाजपला यश देणारा जिल्हा

यवतमाळमध्ये यवतमाळ, राळेगाव, वणी, आर्णी, उमरखेड येथे चुरशीचा सामना आहे. वर्धेत चारही मतदारसंघांत भाजप तगड्या फाइटमध्ये आहे. अकोला भाजपला शत-प्रतिशत यश देणारा जिल्हा आहे, हे समीकरण सांभाळण्यासाठी यावेळी बाळापुरात शिंदेसेनेला उमेदवार पुरविला.

भाजपकडून नव्या समीकरणाची मांडणी, पण... 

अकोला पश्चिममध्येही बंडखोरी झाली आणि आघाडीने मात्र मतविभाजन टाळून आव्हान निर्माण केले, अकोला पूर्व, मूर्तिजापूर, अकोट येथे वंचितचे मतविभाजन निर्णायक ठरते. वाशिम व कारंजात नव्या समीकरणांची मांडणी केली आहे; पण रिसोडमध्ये माजी आमदार अनंतराव देशमुखांना थांबविणे भाजपला शक्य झाले नाही.

बुलढाण्यात भाजपसमोर कोणाचे आव्हान?

बुलढाण्यातील सातपैकी चार मतदारसंघांत भाजपने जुनाच सारीपाट नव्याने मांडला आहे. मलकापुरात चैनसुख संचेती यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची आहे. जळगाव जामोद मध्ये डॉ. संजय कुटे हे पाचव्यांदा रिंगणात आहेत. खामगावात आकाश फुंडकर व चिखलीत श्वेता महाले यांना काँग्रेसच्या माजी आमदारांचे आव्हान आहे.

भाजपची कोणाविरोधात लढाई?

भाजपचे उमेदवार ४७ भाजप विरुद्ध काँग्रेस ३५ भाजप विरुद्ध रा. श. पवार ८भाजप विरुद्ध उद्धवसेना ४ 

विदर्भातील राजकीय चित्र काय?

२००९ च्या निवडणुकीत काँग्रेस विदर्भात क्रमांक एकचा पक्ष होता. साहजिकच लोकशाही आघाडी सरकारची राज्यात पुन्हा सत्ता आली. २०१४ मध्ये भाजपने तब्बल ४४ जागा जिंकत मुसंडी मारली व १२२ जागांसह राज्यात भाजप सर्वांत मोठा पक्ष बनला. २०१९ मध्ये भाजपने विदर्भात १५ जागा गमावल्या. राज्यात भाजप २०५ जागांवर आला. म्हणजे विदर्भातील पीछेहाट हाच राज्याचा फरक राहिला.

भाजपने ७ मतदारसंघांत भाकरी फिरविली

भारतीय जनता पक्षाने यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भातील सात आमदारांना उमेदवारी नाकारली. त्यामध्ये चंदशेखर बावनकुळे यांच्यासाठी कामठीचे टेकचंद सावरकर, आर्णीचे संदीप धुर्वे, उमरखेडचे नामदेव ससाणे, आर्वीचे दादाराव केंचे, गडचिरोलीचे डॉ. देवराव होळी, नागपूर मध्यमधील विकास कुंभारे, वाशिममधून चार वेळा जिंकलेले विजेते लखन मलिक अशा सहा आमदारांची उमेदवारी कापून भाकरी फिरविली आहे. त्यामुळे या मतदारसंघात अॅन्टी इन्कम्बन्सी टाळून आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे.

लोकसभेला १८ मतदारसंघात पुढे

विदर्भातील लोकसभेला महाविकास आघाडीला ६२ विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल ४३ मतदारसंघांत मताधिक्य मिळाले. १८ मतदारसंघांत महायुतीचे उमेदवार पुढे होते, तर बुलढाण्यातील सिंदखेड राजा या एका मतदारसंघात अपक्ष उमेदवार आघाडीवर होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत विदर्भातून भाजपने ४४ जागा जिंकल्या. 

२०१९ मध्ये २९ जागांवर समाधान मानावे लागले, लोकसभा निवडणुकीत केवळ दोन जागा मिळाल्या. त्यामुळे आतापासून धडा घेत भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी समन्वयातून घराघरांपर्यंत पोहोचण्याची रणनीती हाती घेतली असून त्याला सरकारच्या विकास योजनांची जोड दिली जात आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेस