काटोल : राज्याचे माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुख यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्याची घटना सोमवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात देशमुख गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार काटोल मतदार संघातील नरखेड येथील सांगता सभा आटपून अनिल देशमुख हे तीनखेडा भिष्णुर मार्गाने परत येत असताना काटोल-जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ काही व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. त्यांना उपचारासाठी काटोल येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे. रुग्णालयाबाहेर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोेठी गर्दी केली आहे.