सावरकरांचा अपमान करणाऱ्यांनी महाराष्ट्राचा अपमान केलाय, प्रियांश खर्गेंविरोधात भाजपा आमदार आक्रमक

By मंगेश व्यवहारे | Published: December 8, 2023 12:25 PM2023-12-08T12:25:47+5:302023-12-08T12:26:28+5:30

Maharashtra Assembly Winter Session: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे सुपूत्र प्रियांश खरगे यांनी कर्नाटक विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकर हे वीर नव्हते. मी प्रभारी असतो तर सावरकरांचा फोटो विधानसभेतून काढून टाकला असता.

Maharashtra Assembly Winter Session: Those who insulted Savarkar have insulted Maharashtra, BJP MLA aggressive against Priyansh Kharge | सावरकरांचा अपमान करणाऱ्यांनी महाराष्ट्राचा अपमान केलाय, प्रियांश खर्गेंविरोधात भाजपा आमदार आक्रमक

सावरकरांचा अपमान करणाऱ्यांनी महाराष्ट्राचा अपमान केलाय, प्रियांश खर्गेंविरोधात भाजपा आमदार आक्रमक

- मंगेश व्यवहारे
नागपूर  - काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे सुपूत्र प्रियांश खरगे यांनी कर्नाटक विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकर हे वीर नव्हते. मी प्रभारी असतो तर सावरकरांचा फोटो विधानसभेतून काढून टाकला असता. या वक्तव्यावरून राज्यभर राण पेटले आहे. त्याचे पडसाद आज विधानभवनातही दिसून आलेत. परिसरात भाजपच्या आमदारांनी स्वातंत्र्यावीरांचा अवमान करणाऱ्या काँग्रेसच्या निषेधार्थ निदर्शने केली.

आंदोलनात आशिष शेलार, बंटी भांगडिया, सुनील राणे, प्रवीण दटके, टेकचंद सावरकर, सीमा हिरे, मोनिका रानजळे, हरीभाऊ बागडे, नमिता मुंदडा, राजेश पाडवी, मंदा म्हात्रे, सुधीर गाडगीळ, राणा जगजितसिंग, उमा खापरे, राम कदम, समीर मेघे सहभागी होते. यावेळी बोलताना आशिष शेलार म्हणाले,‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान म्हणजे समस्त क्रांतीकारक आणि देशभक्तांचा अपमान आहे. हा देश त्यांचे बलिदान नाकारू शकत नाही. इंदिरा गांधी यांनी स्वत: त्यांच्या बलिदानाचे समर्थन केले होते. पण, काँग्रेस आणि खरगे वारंवार सावरकरांना बदनाम करत आहे. ते महाराष्ट्रद्रोही असून त्यांना उद्धव ठाकरे साथ देत आहेत. त्यामुळे या विषयावर उद्धव ठाकरेंनी जबाब द्यावा.’

Web Title: Maharashtra Assembly Winter Session: Those who insulted Savarkar have insulted Maharashtra, BJP MLA aggressive against Priyansh Kharge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.