लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आजचा उद्यमी व प्रगतिशील महाराष्ट्र घडवण्यामध्ये अनेकांनी आपले योगदान दिले. मराठी माणसाने विश्व पादाक्रांत केले ते याच महाराष्ट्रातील पोषक संस्कारांमुळे आणि भक्कम पाठिंब्यामुळे, मग ते संत महात्मे असोत, क्रांतिकारी देशभक्त पुढारी असोत. उद्योजक, साहित्यिक, कीर्तनकार- प्रवचनकार, चित्रपट-नाट्य निर्माते-दिग्दर्शक-कलाकार, समाजसुधारक आदी आदी. या सगळ्यांच्या प्रेरणेने आजचा महाराष्ट्र पुरोगामी, सृदृढ व मार्गदर्शक सकारात्मक विचारांचा आहे. महाराष्ट्र घडताना शतकाचा प्रवास व्हावा लागला आणि त्यातील प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर वळणे घेत घेत महाराष्ट्र आपली विजय पताका फड़कवतो आहे याचेच दर्शन नृत्य-नाट्य-गायनाच्या मध्यमाने घडविणारा कार्यक्रम दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्यावतीने आयोजित करण्यात आला. निमित्त होते महाराष्ट्र दिनाचे.
महाराष्ट्र दिन : महाराष्ट्र दिंडीने घडवला शतकातील वळणांचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 22:27 IST
आजचा उद्यमी व प्रगतिशील महाराष्ट्र घडवण्यामध्ये अनेकांनी आपले योगदान दिले. मराठी माणसाने विश्व पादाक्रांत केले ते याच महाराष्ट्रातील पोषक संस्कारांमुळे आणि भक्कम पाठिंब्यामुळे, मग ते संत महात्मे असोत, क्रांतिकारी देशभक्त पुढारी असोत. उद्योजक, साहित्यिक, कीर्तनकार- प्रवचनकार, चित्रपट-नाट्य निर्माते-दिग्दर्शक-कलाकार, समाजसुधारक आदी आदी. या सगळ्यांच्या प्रेरणेने आजचा महाराष्ट्र पुरोगामी, सृदृढ व मार्गदर्शक सकारात्मक विचारांचा आहे. महाराष्ट्र घडताना शतकाचा प्रवास व्हावा लागला आणि त्यातील प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर वळणे घेत घेत महाराष्ट्र आपली विजय पताका फड़कवतो आहे याचेच दर्शन नृत्य-नाट्य-गायनाच्या मध्यमाने घडविणारा कार्यक्रम दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्यावतीने आयोजित करण्यात आला. निमित्त होते महाराष्ट्र दिनाचे.
महाराष्ट्र दिन : महाराष्ट्र दिंडीने घडवला शतकातील वळणांचा प्रवास
ठळक मुद्देदक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचा पुढाकार