शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

सरसंघचालक आणि नितीन गडकरी यांच्यात ‘चाय पे चर्चा’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2019 9:43 PM

सत्तास्थापनेची कोंडी अद्यापही फुटली नसताना राष्ट्रीय स्वयंसेवक ेसंघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अल्पकाळासाठी बंदद्वार चर्चा झाली.

नागपूर : सत्तास्थापनेची कोंडी अद्यापही फुटली नसताना राष्ट्रीय स्वयंसेवक ेसंघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अल्पकाळासाठी बंदद्वार चर्चा झाली. ‘जिव्हाळा’ संस्थेतर्फे नागपुरातील सायंटिफिक सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम झाल्यानंतर दोघांमध्येही कार्यक्रमस्थळाखाली असलेल्या ‘डिपार्टमेन्टल स्टोअर’च्या कार्यालयात चर्चा झाली. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली ते कळू शकले नाही. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार  राजकीय स्थितीवर चर्चा आधारित होती.कार्यक्रम संपल्यावर दोघांच्याही प्रतिक्रियेसाठी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची गर्दी झाली होती. परंतु एकाही दरवाजाने ते बाहेर न पडल्याने सर्वच संभ्रमात पडले. सरसंघचालक व गडकरी दोघेही थेट कार्यक्रमाच्या सभागृहाखालील ‘डिपार्टमेन्टल स्टोअर’मध्ये पोहोचले होते. तेथील कार्यालयात राज्याचे उर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ.अनिल सोले, भाजपचे विदर्भ प्रांत संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. १० ते १२ मिनीटे सर्व जण आत होते. त्यानंतर ते बाहेर पडले. आम्ही केवळ चहापानासाठी थांबलो होतो असे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या भेटीत राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Mohan Bhagwatमोहन भागवतNitin Gadkariनितीन गडकरीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपाShiv Senaशिवसेना