शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Maharashtra Election 2019: मुख्यमंत्र्यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुनावणी सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 5:15 PM

Maharashtra Election 2019: दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आशीष देशमुख, जय जवान जय किसानचे उमेदवार

नागपूर : मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रात डिसेंबर २०१८ च्या नोटरीचा शिक्का वापराला आहे, असा आक्षेप घेत त्यांचा अर्ज रद्द करण्याची मागणी काँग्रेस, आप, व अपक्ष उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे केली आहे. दुपारी ४ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी शेखर घाडगे यांच्याकडे याविषयावरील बंदद्वार सुनावणी सुरू झाली आहे. 

दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आशीष देशमुख, जय जवान जय किसानचे उमेदवार प्रशांत पवार व आम आदमी पार्टीचे उमेदवार अमोल हाडके यांनी तसा आक्षेप नोंदविला आहे. मुख्यमंत्र्यांच्या शपथपत्रावर वापरलेला संबंधित नोटरीचा शिक्का कालबाह्य झाला आहे. त्यामुळे तो ग्राह्य धरता येणार नाही. मुख्यमंत्र्यांनी अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे निवडणूक विभागाने शुक्रवारी सायंकाळी ६ पर्यंत नोटीस बोर्डावर जाहीर केलेली नव्हती. ती आॅनलाईनही उपलब्ध नव्हती. या संदर्भातही निवडणूक अधिकारी व सदर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. शुक्रवारी आक्षेपानंतर मुख्यमंत्र्यांच्या अर्जासोबत सादर केलेली कागदपत्र सील करण्यात आली. ती पंचांसमक्ष उघडावी, अशी मागणीही आशीष देशमुख व पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. आम आदमी पार्टी, बीएसपी, काँग्रेस व अपक्ष उमेदवार व त्यांचेही प्रतिनिधी सुनावणीत सहभागी झाले आहेत. 

दरम्यान, मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस हे निवडणूक निर्णय अधिकाºयांवर दबाव टाकत आहेत. राज्यातील निवडणुका पारदर्शीपणे होण्यासाठी राष्ट्रपतींनी राज्यातील फडणवीस सरकार बरखास्त करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाChief Ministerमुख्यमंत्रीAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019