शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
2
मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार; सरकारचा मोठा निर्णय
3
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
4
MUDA जमीन घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांना मोठा धक्का, हायकोर्टाने दिले असे आदेश
5
मृत्यूच्या १० मिनिटे आधी अक्षय शिंदेसोबत काय घडलं?; पोलिसांनी जागीच केला एन्काउंटर
6
Navratri 2024: घरात सुख-समृद्धीसाठी घटस्थापनेआधी देव्हाऱ्यात करा 'हे' दहा मुख्य बदल!
7
संजय राऊतांनी शेअर केला अक्षय शिंदेचा व्हिडीओ; शिंदे-फडणवीसांना म्हणाले...
8
"रक्ताचे डाग होते, फ्रिज उघडताच..."; महालक्ष्मीच्या आईने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
9
ना, सचिन, ना रोहित, ना विराट! अश्विन म्हणतो 'हा' खेळाडू भारतीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा
10
अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
11
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
12
मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी पुन्हा रहाणे; चॅम्पियन संघाचा कर्णधार, अय्यर-ठाकूरही मैदानात
13
अधिक व्याज देईल 'ही' स्कीम,  ₹१०,००,००० च्या गुंतवणूकीवर मिळतील ₹३०,००,०००; फक्त एक ट्रिक वापरा
14
अरबाजने सांगितलं छत्रपतींचा जयजयकार न करण्याचं कारण, म्हणाला "मी संभाजीनगरचा आणि..."
15
तुमच्या देवघरात ‘या’ देवता आहेत? ‘ही’ मूर्ती कधीही ठेवू नये! पण का? शास्त्र सांगते...
16
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
17
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
18
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
19
सुनिल गावसकरांना दिलेली करोडोंची जमीन काढून अजिंक्य रहाणेला दिली; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
20
"माझ्या पत्नीचे अशरफशी संबंध, त्यानेच...": बंगळुरू हत्याकांडातील महालक्ष्मीच्या पतीचा मोठा दावा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद; राज्य सरकारने पुर्नविचार याचिका दाखल करावी, उद्धव ठाकरेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 4:02 PM

Winter Session Maharashtra 2022 : महाराष्ट्राच्या हिताचं जे काही असेल, तिथे दुमत असण्याचं कारण असूच नये या मताचे आम्ही सगळे आहोत आणि म्हणून आम्ही त्याला एकमताने पाठिंबा दिलेला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले

नागपूर : महाराष्ट्र-कर्नाटक हा सीमावाद पुन्हा एकदा कर्नाटककडून चिघळवण्यात आला आहे. आपल्या डोळ्यादेखत तिथला मराठी ठसा पुसला जाईल. तो पुसला जाऊ नये याकरता राज्य सरकारने एक पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना केली.

देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि आपल्या उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर देखील त्यांनी ठराव मांडला. त्या ठरावामध्ये एक इंचसुद्धा जमीन आम्ही महाराष्ट्राला देणार नाही असा एक आक्रमक आणि कौरवी थाटाचा प्रस्ताव मांडला. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये सुद्धा आपल्याला त्यावर उत्तर देण्याची गरज होती. मी सरकारचे अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की  निदान तिथल्या सीमा भागातील जे अन्यायग्रस्त मराठी भाषिक आहेत, त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे आहोत असा ठराव त्यांनी आज मंजूर केला, त्याला साहाजिकच आम्ही पाठिंबा दिला. महाराष्ट्राच्या हिताचं जे काही असेल, तिथे दुमत असण्याचं कारण असूच नये या मताचे आम्ही सगळे आहोत आणि म्हणून आम्ही त्याला एकमताने पाठिंबा दिलेला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

यासह आणखी काही गोष्टी सभागृहातही सुचवणार आहे. त्या तुमच्या समोरसुद्धा मांडतो, की तिथल्या नागरिकांना आपल्याकडे काय सुविधा देण्यात येतील, त्याच्यामध्ये थोडी स्पष्टता पाहिजे. या राज्यातील योजनांची त्या राज्यामध्ये अंमलबजावणी होते का? निदान त्या लोकांना योजना आणि त्या योजनांतर्गत जे काही लाभ आहेत ते आपण देऊ शकणार आहोत की मूळ मुद्दा बाजूलाच असेल. मुद्दा हा योजनांसाठी नाही तर भाषिक अत्याचाराबद्दल आपण काय करणार आहोत, हा आहे.

जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र आहे. तो भूभाग केंद्रशासित झाला पाहिजे, झालाचं पाहिजे ही आमची मागणी आहे. परंतु, तो केंद्रशासित करता येणार नाही, ती परिस्थिती तशीच्या तशी ठेवावी असे काही वर्षांपूर्वी सुप्रीम कोर्टाने सांगितले होते. मुद्दा असा येतो की २००६ किंवा २००८ पर्यंत सर्व ठीक होतं. पण त्याच्यानंतर परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा जो काही आदेश सुप्रीम कोर्टाने दिला त्या आदेशाची अंमलबजावणी कर्नाटकात होत नाहीये. अत्यंत आक्रमकपणाने कर्नाटक सरकार एक-एक पाऊल पुढे टाकत चालले आहे. कालांतराने असं होईल की महाराष्ट्र संयमाने वागेल, आपल्या संस्काराप्रमाणे शांतपणे वागेल, मजबुतीने उभा राहील. पण आपल्या डोळ्यादेखत तिथला मराठी ठसा पुसला जाईल आणि तो पुसला जाऊ नये याकरता एक पुनर्विचार याचिका आपल्या सरकारकडनं ताबडतोब सर्वोच्च न्यायालयात दाखल होण्याची गरज आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आपण शांतपणाने कोर्टाचा निर्णय येण्याची वाट बघत असताना आपल्या डोळ्यादेखत आपल्या माता भगिनी आणि बांधवांवरती भाषिक अत्याचार सुरू आहेत. हे अत्याच्यार थांबवण्यासाठी पुन्हा मला वाटते की महाराष्ट्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली गेली पाहिजे. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत हा संपूर्ण भूभाग केंद्रशासित करण्याचा आग्रह आपण केला पाहिजे. मला अजून स्पष्ट झालेले नाही की एका राज्याच्या योजना दुसऱ्या राज्यात लागू होऊ शकतात का? कारण जिथे कर्नाटकचे मुख्यमंत्री आपल्या नेत्यांना आणि मंत्र्यांना येऊ देत नाही तिथे ते योजना येऊ देतील का? त्याचबरोबर तिथे जे काही अत्याचार होत आहेत, अटका केल्या जातात खटले भरले जातात त्यावर काय उपाय आहेत. त्या सर्व खटल्यांसाठी महाराष्ट्र सरकारने वकील द्यावेत, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. 

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामिन मिळण्याची शक्यता आहे, याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ठाकरे म्हणाले, माझ्या बाजुला संयय राऊत उभे आहेत. त्यांना कोणतेही कारण नसताना तुरुंगात पाठविले. ज्या लोकांनी त्यांना तुरुंगात पाठविले त्यांच्यावर आता आपल्याच तोंडाला काळे फासण्याची वेळ आलीये, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आदित्य ठाकरे, खा. संजय राऊत आदि उपस्थित होते.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्र