शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

महाराष्ट्रातील साहित्यिकांनी यशवंतरावांना न्याय दिला नाही : मधुकर भावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 22:28 IST

१९७४ च्या इचलकरंजी येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पु.ल. देशपांडे यांनी यशवंतराव चव्हाण संमेलनात येऊ नये यासाठी प्रयत्न केला तर पुढल्या वर्षी कराडला झालेल्या संमेलनात अध्यक्ष दुर्गा भागवत यांनी त्यांना व्यासपीठावर बसू दिले नाही. महाराष्ट्र घडविणाऱ्या नेत्याची अशी अवहेलना कुणाच्याही वाट्याला आली नाही. सात संमेलनांचे उद्घाटक व सहा संमेलनांचे स्वागताध्यक्ष राहिलेल्या यशवंतरावांनी अनेक दर्जेदार पुस्तकांचे लिखाणही केले असून ते अशा प्रतिथयश साहित्यिकांपेक्षा काकणभरही कमी नाही. मात्र यशवंतरावांना संमेलनाचा अध्यक्ष बनवावा, असे या साहित्यिकांना वाटले नाही. महाराष्ट्रातील साहित्यिकांनी यशवंतरावांना न्याय दिला नाही, अशी खंत ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देयशवंतराव चव्हाण जयंतीनिमित्त व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १९७४ च्या इचलकरंजी येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पु.ल. देशपांडे यांनी यशवंतराव चव्हाण संमेलनात येऊ नये यासाठी प्रयत्न केला तर पुढल्या वर्षी कराडला झालेल्या संमेलनात अध्यक्ष दुर्गा भागवत यांनी त्यांना व्यासपीठावर बसू दिले नाही. महाराष्ट्र घडविणाऱ्या नेत्याची अशी अवहेलना कुणाच्याही वाट्याला आली नाही. सात संमेलनांचे उद्घाटक व सहा संमेलनांचे स्वागताध्यक्ष राहिलेल्या यशवंतरावांनी अनेक दर्जेदार पुस्तकांचे लिखाणही केले असून ते अशा प्रतिथयश साहित्यिकांपेक्षा काकणभरही कमी नाही. मात्र यशवंतरावांना संमेलनाचा अध्यक्ष बनवावा, असे या साहित्यिकांना वाटले नाही. महाराष्ट्रातील साहित्यिकांनी यशवंतरावांना न्याय दिला नाही, अशी खंत ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे यांनी व्यक्त केली.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने त्यांच्या १०६ व्या जयंतीचे औचित्य साधून ‘यशवंतराव चव्हाण यांचा सांस्कृतिक विचार आणि आजची स्थिती’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन बाबुराव धनवटे सभागृहात करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ता म्हणून भावे बोलत होते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या यशवंतरावांनी राज्याची राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडण केली. गृहमंत्री म्हणून देशाचेही नेतृत्व केले. राजकारणात त्यांचे कर्तृत्व मोठे आहे तसे साहित्य व संस्कृतीच्या क्षेत्रातही आहे. संस्कारी, सांस्कृतिक, विचारवंत, वाचक, साहित्यिक, संगीत प्रेमी अशा सर्व अंगाने त्यांची ओळख करणे महत्त्वाचे आहे. राज्यकर्त्यांच्या दोन डोळ्यांपैकी एक संस्कृतीचा असावा, असे मानणारे ते होते. त्यांनी कृष्णाकाठ, युगांत अशा पुस्तकातून दर्जेदार साहित्य रचले. त्यांनीच साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली व एवढेच नाही तर लक्ष्मण जोशी, ना.धो. महानोर, ग.दि. माडगूळकर अशा अनेक दिग्गजांना महत्त्वाच्या पदावर विराजमानही केले. माणस शोधून त्यांना आवश्यक ठिकाणी नियुक्त करून महाराष्ट्र समृद्ध करण्याचे काम त्यांनी केले. असा सांस्कृतिक डोळा आजच्या राज्यकर्त्यांना नाही, असे परखड मत भावे यांनी मांडले.डोक्यावरून मैला वाहुन नेण्यास बंदी घालण्याचे विधेयक मांडणारे महाराष्ट्र पहिले राज्य होते. यातूनच त्यांचा सुसंस्कृतपणा दिसून येतो. तमाशा कलावंत, कुस्तीगिर, साहित्यिक आदींना मानधन देण्याची सुरुवात त्यांनी केली. मुंबईत साहित्यिकांच्या निवासाची व्यवस्था केली. त्यांच्या तोडीचा एकही राजकारणी आज मिळणे शक्य नाही. त्यांच्या सुसंस्कृतपणाचा वारसा राज्यकर्त्यांना जपता आला नाही, याची खंत भावे यांनी व्यक्त केली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी यांनीही विचार व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. प्रमोद मुनघाटे, अनिल इंदाणे, प्रेमबाबू लुनावत आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. प्रदीप विटाळकर व संचालन रेखा दंडिगे-घिया यांनी केले. कवी लोकनाथ यशवंत यांनी आभार मानले.

टॅग्स :Yashwantrao Chavhanयशवंतराव चव्हाणliteratureसाहित्य