नागपृूर : कामगार चळवळीचे प्रणेते नारायण लोखंडे यांचा स्मृतिदिन आणि महाराष्ट्र असंघटित कामगार संघटनेचा स्थापना दिन वाठोडा रोड येथील विद्यानगरात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते अमृत मेश्राम होते. मनापाचे निवृत्त समाज कल्याण अधिकारी सुधा इरसकर, बॅंक ऑफ इंडियाच्या नागपूर विभागाचे उपमहाव्यवस्थापक विलास पराते, जिल्हा व्यवस्थापक पंकज देशमुख, प्रा. प्रकाश निमजे, सुनील सरदार, राजेश अय्यर, डॉ. सुधीर बोधनकर, पद्मनाभ वऱ्हाडपांडे, सुनील पालिवाल उपस्थित होते.
संघटनेच्या माध्यमातून राज्यातील असंघटित कामगारांना न्याय मिळवून देऊ, असे अमृत मेश्राम म्हणाले. सुधा इरसकर यांनी महानगरपालिकेच्या कामगारांसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली. विलास परब यांनी झिरो बॅलेन्स बॅंक खाते कसे काढावे, यासंदर्भात मार्गदर्शन केले. पंकज देशमुख यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन भूषण नागपुरे यांनी केले, तर आभार डाॅ. रवी गिऱ्हे यांनी मानले. असंघटित कामगार आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.