शहरं
Join us  
Trending Stories
1
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
4
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
5
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
6
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
7
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
8
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
9
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
10
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
11
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
12
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
13
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
14
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
15
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
16
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
17
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
18
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
19
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
20
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी

Maharashtra Winter Session 2022 : विधानभवनातील शिवसेना कार्यालय कोणाला? पवार-दानवे भडकले, मुख्यमंत्र्यांचा संयम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 6:03 AM

शिवसेनेचे कार्यालय कोणाला? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला की उद्धव ठाकरे यांच्या गटाला यावरून विधानभवनात वातावरण चांगलेच तापले.

नागपूर : नागपूरचे विधिमंडळ अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असताना शिवसेनेचे कार्यालय कोणाला? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला की उद्धव ठाकरे यांच्या गटाला यावरून विधानभवनात वातावरण चांगलेच तापले. अखेर उद्धव ठाकरे गटाला हे कार्यालय घेतले.  राज्यात गेल्या जूनमध्ये सत्तांतर झाले. त्यानंतर मुंबईत झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात देखील शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाला की ठाकरे गटाला यावरून वाद पेटला होता. ठाकरे गटाने कार्यालयावर ताबा मिळविला होता. नागपुरातही हाच प्रकार घडला. आपल्या आमदारांना बसण्यासाठी माझे कार्यालय आहे. आपल्या मंत्र्यांची देखील कार्यालय आहेत. त्यामुळे संघर्ष कशाला अशी समजूतदारपणाची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या अधिवेशनात घेतली होती आणि वाद टाळला होता. तीच भूमिका यावेळी देखील ते घेतील, असे म्हटले जात आहे. 

नागपूर विधानमंडळ विधान भवन परिसरात असलेले शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाला दिले जात आहे आणि तसा लेखी आदेशही येत असल्याची कुणकुण लागताच विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नागपूरच्या विधानभवनात पोहोचले. तेथे त्यांनी विधान मंडळ सचिव राजेंद्र भागवत आमच्याकडे विचारणा केली तसेच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देखील ते भेटले.

विधान मंडळाच्या रेकॉर्डनुसार आजही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. मग शिंदे गटाला कार्यालय कोणत्या अधिकारात दिले जात आहे असा सवाल दानवे यांनी केला. दुसऱ्या गटाला कुठे कार्यालय द्यायचे की नाही द्यायचे हे तुमचे तुम्ही ठरवा पण आमच्या कार्यालयाला धक्का लावू नका, असे ते म्हणाले.

आमदार, शिवसैनिक कोणासोबत हे महत्त्वाचे शिंदे गटाचे एक मंत्री ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, आमचे नेते मुख्यमंत्री शिंदे यांनी गेल्या अधिवेशनातही या विषयावर संघर्षाची भूमिका घेतलेली नव्हती. उद्धव ठाकरे गटाला कार्यालय देण्यात आले होते, त्यावेळी देखील आम्ही विरोध केलेला नव्हता. शेवटी कार्यालय कोणाचे यापेक्षा बहुसंख्य आमदार, शिवसैनिक, पदाधिकारी कोणासोबत हे महत्त्वाचे आहे, असा टोला देखील या मंत्र्यांनी हाणला.

त्यांना हवे तर महाल द्या.... 

  • दानवे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, १९९० पासून विधानभवन परिसरात शिवसेनेला जे कार्यालय दिले जाते तेच यावेळीही दिले गेले पाहिजे अशी आमची भूमिका आहे. 
  • या कार्यालयात आमचे कर्मचारी आजपासूनच रूजू झाले आहेत. कामकाज सुरू केले आहे. हे कार्यालय आमच्याकडेच राहील. शिंदे गटाला मोठे कार्यालय द्या, वाटल्यास महाल द्या पण आम्ही हे कार्यालय सोडणार नाही, असेही त्यांनी बजावले. 
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे