लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतकरी चांगल्या गाडीतून फिरला पाहिजे, समृद्धी महामार्गामुळे तो आता फिरत आहे. शेतकऱ्यांनी हेलिकॉप्टरमधून फिरले पाहिजे, त्यासाठी तालुकास्तरावर हेलिपॅड उभारत आहे. रुग्णांना एअरलिफ्ट करता येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.
विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी शेतकरी हितासाठी घेतलेल्या अनेक निर्णयांचा पाढाच वाचला. त्याच वेळी मुख्यमंत्र्यांनी जोरदार राजकीय टोलेबाजीही केली.
पंढरपूर विकास आराखडा पुढे नेणार
पंढरपूर विकास आरखडा स्थानिकांना विश्वासात घेऊन पुढे नेऊ. लाखो वारकऱ्यांसाठी सुविधा निर्माण केल्या जातील. इतर देवस्थानांप्रमाणेच पंढरपुरात परिवर्तन झाले पाहिजे, सुविधा मिळाव्यात, या आमच्या भावना आहेत, असे ते म्हणाले.
अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारी रोजी मुंबईत
पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीला मुंबईत होईल. १० दिवस चाललेल्या हिवाळी अधिवेशनात १०६ लक्षवेधींवर चर्चा झाली; तर १५ विधेयके संमत झाली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"