शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

सोलर रूफ टॉप लावणारे संकटात; महाराष्ट्राचे १२३ कोटी रुपये पुन्हा बुडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 7:00 AM

घर-प्रतिष्ठानांमध्ये सोलर रूफ टॉप लावून ऊर्जा संवर्धनात योगदान देणाऱ्यांना या वर्षी सबसिडीपासून वंचित राहावे लागणार आहे.

ठळक मुद्देमहावितरणचे पोर्टल अद्याप तयार नाही

कमल शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घर-प्रतिष्ठानांमध्ये सोलर रूफ टॉप लावून ऊर्जा संवर्धनात योगदान देणाऱ्यांना या वर्षी सबसिडीपासून वंचित राहावे लागणार आहे. केंद्र सरकारने राज्यात ५० मेगाव्हॅट क्षमतेचे सोलर रूफ टॉप लावण्यासाठी १२३ कोटी रुपयाची सबसिडी मंजूर केली आहे. मात्र, सबसिडीकरिता आवेदन करण्यासाठी जे पोर्टल हवे आहे, ते महावितरणने तयारच केले नाही. त्यामुळे, मंजूर झालेले १२३ कोटी रुपये बुडणार आहेत.

विशेष म्हणजे ही समस्या गेल्या वषार्पासून उभी झाली आहे. २०१७-१८मध्ये ११३ कोटी आणि २०१८-१९मध्ये ७७.२२ कोटी रुपये सबसिडी सोलर रूफ टॉप करिता मंजूर करण्यात आली असतानाही, राज्य सरकार व सरकारची विद्युत वितरण कंपनी असलेल्या महावितरणच्या उदासीन धोरणामुळे एप्रिल २०१९ नंतर नागरिकांना ही सबसिडी प्राप्त झालेली नाही. राज्य सरकारने २०१९मध्ये सोलर रूफ टॉपच्या सबसिडीची जबाबदारी महाऊर्जाकडून काढून महावितरणकडे सोपवली होती. मात्र, महाऊर्जा प्रमाणेच महावितरणनेही सबसिडीसंदर्भात कोणतेही स्वतंत्र असे पोर्टल तयार केले नाही. त्यामुळे, त्या वर्षात सोलर रूफ टॉपसाठीच्या सबसिडीकरिता कुणीच आवेदन केले नाही. परिणामत: एप्रिल २०२०मध्ये केंद्राकडून १०० मेगाव्हॅट क्षमतेचे रूफ टॉप विकसित करण्यासाठी मंजूर झालेली १२३ कोटी रुपये सबसिडी बुडाली.

त्यानंतर केंद्राने २०२०-२१साठी सुद्धा महाराष्ट्रात १०० मेगाव्हॅट क्षमता विकसित करण्यासाठी १२३ कोटी रुपये सबसिडी मंजूर केली आहे. परंतु, सहा महिने उलटल्यावरही महावितरणकडून कोणताच पुढाकार घेतला गेला नाही. त्यामुळे, सोलर रूफ टॉप लावणारे संकटात सापडले आहेत. रूफ टॉप लावताना प्रति किलोव्हॅट १४ हजार रुपये सब्सिडी मिळेल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले होते. मात्र, जेव्हा या आश्वासनपूर्तीकरिता गेले तेव्हा पोर्टल नसल्याने आवेदनच करता येत नसल्याने त्यांना कळाल्याचे सांगितले जात आहे.ऊर्जा संवर्धनापेक्षा, राजस्वाची चिंता जास्त: सोलर रूफ टॉप लावल्याने पारंपारिक उर्जेचा उपयोग कमी होतो आणि त्यामुळे पर्यावरण संवर्धन साधले जाते. मात्र, महावितरणला आपल्या राजस्वाची चिंता जास्त असल्याचे सुत्रांकडून सांगितले जात आहे. सौरऊजेर्चा उपयोग वाढल्याने बिल कमी होईल आणि त्याचा थेट परिणाम महावितरणच्या राजस्वावर पडणार आहे. महावितरणनेही सौरऊजेर्मुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे आधीच कबूल केले आहे. याच कारणाने महावितरणने सबसिडीविषयी उदासीण धोरण अवलंबिले आहे. या संदर्भात कंपनीचे अधिकारी बोलण्याची टाळाटाळ करत आहेत, हे विशेष.

टॅग्स :electricityवीज