शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

जिल्ह्यात उद्या ‘एक तास स्वच्छतेसाठी’ महाश्रमदान उपक्रम

By गणेश हुड | Published: September 30, 2023 3:43 PM

विविध उपक्रमात दोन लाख नागरिकांचा सक्रिय सहभाग

नागपूर : १५ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा पंधरवाडा हा उपक्रम जिल्ह्यात राबविला जात आहे.  महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून रविवारी  एक तास स्वच्छतेसाठी हा उपक्रम राबविण्याबाबत  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला आवाहन केलेले आहे. त्यानुसार  नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये एकाच वेळी १ तास स्वच्छतेसाठी ह्या महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

स्वच्छता ही सेवा २०२३ ची थीम "कचरामुक्त भारत" आहे. यामध्ये दृष्यमान स्वच्छता व सफाईमित्र कल्याण यावर लक्ष केंद्रित केले आहे. स्वच्छता ही सेवा अभियांनातर्गत जिल्हयात श्रमदान, सफाई कर्मचारी व त्यांच्या परिवाराची आरोग्य तपासणी व गौरव, स्वच्छता रन, चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजूषा स्पर्धा, ईत्यादी विविध उपक्रम राबविण्यात आलेले आहे. या उपक्रमांमध्ये जिल्ह्यातील ग्रामिण भागांमधून सुमारे २ लक्ष नागरिकांनी आपला सक्रीय सहभाग नोंदविलेला आहे. 

‘माझे गाव माझी स्वच्छता’ हे ब्रिद लक्षात घेऊन रविवारी सकाळी १० ते ११ या कालावधीत महाश्रमदान राबविण्यात येणार आहे. लोकसहभागाच्या माध्यमातून प्रत्येक गावांमध्ये ग्रामस्थ स्वत: आपल्या गावाला स्वच्छ-सुंदर करण्यासाठी पुढाकार घेणार आहेत. लोकप्रतिनीधी, जिल्हा परिषद,पंचायत समिती पदाधिकारी, तसेच  सदस्य हे ग्रामस्थांचा उत्साह वाढविण्यासाठी व ग्रामिण जिवनमान उचावण्यासाठी उत्स्फुर्त सहभाग घेणार आहेत. तर गावस्तरावरील सर्व सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व ग्रामसेवक, तसेच महिला बचत गट, युवक-युवती मंडळे, राष्ट्रीय सेवा योजना, नेहरु युवा केंद्र, एन.सी.सी, चे विद्यार्थी व शालेय विद्यार्थी, तसेच सर्व ग्रामस्तरीय अधिकारी, कर्मचारी हे सहभागी होणार आहेत.

महाश्रमदान कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र तसेच संस्थांनी व नागरिकांनी या उपक्रमात उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी केले आहे. एक तास स्वच्छतेसाठी महाश्रमदान मोहिमेची सुरुवात गावाफेरीने होणार आहे. यात स्वच्छतेचा संदेश दिला जाणार आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानnagpurनागपूर