लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी आता महावितरण पोलिसांची मदत घेणार आहे. राज्यात दिवसेंदिवस वीज कर्मचाऱ्यांसोबत घडत असलेल्या मारहाणीच्या घटनांकडे पाहून महावितरणच्या प्रशासनाने हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे.शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांवर भादंविच्या कलम ३५३, ३३२, ५०४ आणि ५०६ कलमानुसार कठोर कारवाई करण्याची तरतूद आहे. नुकत्याच घडलेल्या घटनांमध्ये महावितरणने हल्लेखोरांविरुद्ध कडक भूमिका घेतली असून आरोपींना अटक करण्यात आली. या आरोपींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी महावितरण पोलिसांची मदत घेत आहे.वीज कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांना कलम ३५३ नुसार दोन वर्षाची शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे. कलम ३३२ नुसार तीन वर्षाची शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे. तर कलम ५०४ आणि ५०६ नुसार जीवघेणा हल्ला केल्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे. महावितरणने आरोपींना तात्काळ अटक व्हावी आणि त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी संबंधित विभागाकडून मदत घेणे सुरू केले आहे.काही ग्राहकांच्या अनुचित व्यवहारामुळे महावितरणची ग्राहकांवरील थकबाकीची रक्कम वाढत चालली आहे. थकबाकी जमा न झाल्यामुळे महावितरणला काम करताना समस्यांचा सामना करावा लागत आहे. महावितरणने प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून सांगितले की, महावितरण कार्यालयांना घेराव घालणे, कर्मचाऱ्यांना कार्यालयात बंद करणे, तोडफोड करणे यासारख्या घटना सातत्याने होत आहेत. अशा स्थितीत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना काम करताना समस्यांच्या सामना करावा लागत आहे.थकबाकीची रक्कम वसूल न झाल्यास विजेचा पुरवठा करणे शक्य होणार नाही, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
वीज कर्मचाऱ्यांना मारहाणप्रकरणी महावितरणने मागितली पोलिसांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 10:29 AM
वीज कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी आता महावितरण पोलिसांची मदत घेणार आहे.
ठळक मुद्देकर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी