लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलतर्फे भागीदार (स्ट्रॅटेजिक पार्टनर) आणण्याच्या प्रयत्नाबाबत महावितरणने कडक भूमिका घेतली आहे. यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेण्यात येणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. जर ग्राहकांना याचा लाभ होत असेल तरच याची मंजुरी दिली जाईल, असेही महावितरणने स्पष्ट केले आहे.महावितरणने निदेशक परिचालन दिनेशचंद्र साबू यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले की, ‘एसएनडीएलला संचालित करणारी कंपनी एस्सेल युटिलिटीचे अध्यक्ष कमल माहेश्वरी यांनी तोंडी माहिती देत सांगितले की, कंपनी भागीदार (स्ट्रॅटेजिक पार्टनर) नियुक्त करीत आहे. महावितरणने यावर त्यांच्याकडून लेखी प्रस्ताव मागितला आहे. साबू यांनी स्पष्ट केले आहे की, हा धोरणात्मक निर्णय असेल. बोर्ड मिटिंगमध्ये यासंदर्भात सदर प्रस्तावावर चर्चा केल्यानंतर तो ऊर्जा मंत्रालयाकडे पाठवला जाईल. यापूर्वी २०११ मध्ये फ्रेन्चाईजी घेणारी कंपनी स्पॅन्कोशी झालेल्या कराराचा अभ्यास करून कायदेशीर सल्ला घेतला जाईल.विशेष म्हणजे एसएनडीएलची आर्थिक स्थिती चांगली नाही. सध्या कंपनीवर महावितरणचे ११४ कोटी रुपये थकीत आहेत. यापैकी दिलेले २१ कोटी रुपयेसुद्धा वादातीत आहे. १०० कोटी रुपयांची बँक गॅरंटी महावितरणकडे सुरक्षित आहे. कंपनीवर ठेकेदारांचेही थकीत आहे. अशा परिस्थितीत एसएनडीएल आर्थिक स्थिती मजबूत करणे आणि वितरण प्रणाली सशक्त करण्याच्या नावाखाली स्ट्रॅटेजिक पार्टनर आणण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी त्यांची इंडिया पॉवर सोबतची चर्चा जवळपास निश्चित झाली आहे.सूत्रांनी मात्र कोलकाता इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी आणि इतर एका इक्विटी कंपनीसोबतही चर्चा सुरु असल्याचा दावा केला आहे. एसएनडीएलचा दावा आहे की, दोन्ही कंपन्या सोबत काम करतील. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही कंपन्या केवळ सहा महिने सोबत राहतील. त्यानंतर पूर्ण कारभार नवीन कंपनीला सोपविला जाईल.२०१२ मध्ये सांभाळले होते काममहावितरणने दीर्घ चर्चेनंतर १ मे २०११ रोजी शहरातील तीन डिव्हीजनमधील वीज वितरण प्रणाली स्पॅन्कोच्या हाती सोपवली होती. स्पॅन्को ही जबाबदारी सांभाळू शकली नाही. त्यांनी एस्सेल समूहाची कंपनी एस्सेल युटिलिटीला आपली भागीदारी विकली. सप्टेंबर २०१२ मध्ये एस्सेल युटिलिटीने एसएनडीएलच्या नावाने शहरातील कामकाज सांभाळले.एसएनडीएलचे कर्मचारी दुविधेतया घटनाक्रमामुळे एसएनडीएलमधील कर्मचारी दुविधेत सापडले आहेत. तसेही कंपनीतील अनेक अधिकाऱ्यांकडून परफॉर्मेंस लिंक्ड इन्सेटिव्ह परत घेण्यात आलेले आहे. ही रक्कम तीन भागात परत घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु यावर बरेच वादळ उठल्याने पगरातून पहिली किस्त कापण्यात आली नाही. मात्र ती रक्कम अॅडव्हान्स म्हणून दाखवण्यात आलेली आहे. त्यामुळे कंपनीमधील कर्मचारी आपल्या भविष्याबाबत दुविधेत आहेत.
एसएनडीएलच्या भागीदाराबाबत महावितरण घेणार कायदेशीर सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 11:09 PM
शहरातील वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलतर्फे भागीदार (स्ट्रॅटेजिक पार्टनर) आणण्याच्या प्रयत्नाबाबत महावितरणने कडक भूमिका घेतली आहे. यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेण्यात येणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. जर ग्राहकांना याचा लाभ होत असेल तरच याची मंजुरी दिली जाईल, असेही महावितरणने स्पष्ट केले आहे.
ठळक मुद्देग्राहकांचे हित लक्षात घेऊन करणार निर्णय