लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरसह जळगाव व औरंगाबाद येथे वीज वितरण फ्रेंचाईजीचा प्रयोग अपयशी ठरल्यानंतरही महावितरणने पुन्हा फ्रेंचाईजीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. १ मार्चपासून मालेगाव व शील-कळवा-मुंब्रा येथील वितरण प्रणालीचे खासगीकरण करीत, त्याला फ्रेंचाईजच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. यासोबतच नागपुरातही पुन्हा फ्रेंचाईजी आणली जाऊ शकते, याचीही चर्चा सुरू झाली आहे.मालेगावची जबाबदारी कोलकाता येथील कंपनी सीईएससीला सोपवण्यात आली आहे. तर शील-कळवा-मुंब्राची जबाबदारी टोरंट कंपनीकडे सोपवली आहे. या कंपन्या १ मार्चपासून कामकाज सांभाळतील. विशेष म्हणजे, केवळ भिवंडीमध्येच फ्रेंचाईजी टिकून आहे. नागपूर, औरंगाबाद आणि जळगाव येथील प्रयोग अपयशी ठरले आहेत. नागपूर शहरातील गांधीबाग, महाल व सिव्हिल लाईन्स डिव्हिजनला फ्रेंचाईजीच्या हवाली करण्यात आले होते. वर्ष २०११ मध्ये स्पॅन्कोला ही जबाबादारी देण्यात आली होती. परंतु कंपनी कामकाज सांभाळू शकली नाही. पुढच्याच वर्षी स्पॅन्कोला एस्सेल समूहाची कंपनी एसएनडीएलने ‘ओव्हरटेक’ केले. कंपनीची थकबाकी २२४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. महावितरणकडून थकबाकीसाठी दबाव टाकला गेल्याने, कंपनीने माघार घेत फ्रेंचाईजी पुढे ठेवण्यास असमर्थता दर्शविली. सप्टेंबरपासून महावितरणने तिन्ही डिव्हिजनचे कामकाज पुन्हा आपल्या ताब्यात घेतले.आता महावितरणतर्फे पुन्हा फ्रेंचाईजीकरणाच्या धोरणाला गती देण्याची चर्चा आहे. नागपुरात तर हा प्रयोग पुन्हा करण्यात येणार नाही ना, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. असे सांगितले जात आहे की, एसएनडीएलने माघार घेण्यापूर्वी इतर कंपन्यांशी यासंदर्भात चर्चा सुरू होती. काही कंपन्या काम करण्यास इच्छुकही होत्या. महावितरणचे मानणे आहे की, नागपुरातच एसएनडीएल चांगले काम करीत होती. येथे फ्रेंचाईजी मॉडेलबाबत काहीही समस्या नव्हती. केवळ एस्सेल समूहाची आर्थिक स्थिती गडबडल्यामुळे कंपनीला माघार घ्यावी लागली. परंतु सध्या तरी महावितरणचे अधिकारी याबाबत उघडपणे काहीही बोलायला तयार नाही. हा धोरणात्मक निर्णय असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.कामगार संघटनांचा विरोधमहावितरणच्या कामगार संघटनांनी फ्रेंचाईजीकरणाचा तीव्र विरोध केला आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी म्हटले आहे की, मालेगाव, शील-कळवा-मुंब्रा येथील कर्मचाऱ्यांना फ्रेंचाईजीला सहकार्य न करण्यास सांगण्यात आले आहे. हे कर्मचारी उद्यापासून समानांतर कामकाजात भाग घेणार नाहीत. त्यांचे म्हणणे आहे की, नागपुरातील फ्रेंचाईजी कंपनी अनेक गडबडी करून गेली. आतापर्यंत थकबाकी कायम आहे. पुन्हा फ्रेंचाईजी गोष्ट आली तर वीज कर्मचारी विरोध करतील.
महावितरण पुन्हा वीज फ्रेंचाईजीच्या दिशेने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 9:28 PM
नागपूरसह जळगाव व औरंगाबाद येथे वीज वितरण फ्रेंचाईजीचा प्रयोग अपयशी ठरल्यानंतरही महावितरणने पुन्हा फ्रेंचाईजीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.
ठळक मुद्देमालेगाव, शील-कळवा-मुंब्रामध्ये खासगीकरण, नागपूरबाबतही चर्चा