लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आर्थिक परिस्थिती सुदृढ करण्यासाठी स्ट्रॅटेजिक पार्टनरच्या शोधात असलेल्या वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलच्या कार्यपद्धतीबाबत महावितरणने कडक भूमिका घेतली आहे. वीज पुरवठ्यातील त्रुटींच्या वाढत्या तक्रारी पाहता महावितरणने एसएनडीएलला येत्या १५ दिवसा कृती आराखडा ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करण्याचे निर्देश दिले आहे.एसएनडीएलच्या क्षेत्रात वीज पुरवठ्याबाबत तक्रारी वाढल्या आहेत. परिस्थिती समजून घेण्याच्या उद्देशाने महावितरणचे संचालक (संचालन) दिनेशचंद्र साबू यांनी शुक्रवारी एसएनडीएलतर्फे करण्यात येणाऱ्या विकास कामांचे निरीक्षण केले. यादरम्यान आढावा बैठकीत त्यांनी वीज पुरवठ्याबाबत असलेल्या तक्रारी सोडविण्यासाठी दर १५ दिवसात महावितरण आणि एसएनडीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्याचेही निर्देश दिले.यावेळी साबू यांनी वर्षभरातील देखभाल व दुरुस्तीच्या कामांचे नियोजन करण्यात यावे, आयपीडीएस, कॅपेक्स, जिल्हा नियोजन योजनेंतर्गत मंजूर कामांची विस्तृत माहिती घेतली. अपघातप्रवण क्षेत्रातील अपघातांचे प्रमाण कमी होण्याकरिता आवश्यक त्या उपाययोजना त्वरित करण्यात याव्यात. वीज यंत्रणा देखभाल व दुरुस्तीसाठी प्रस्तावित वीज खंडित करण्याची (आऊटेज) पूर्वसूचना ग्राहकांना देण्यात यावी, सोबतच एका वाहिनीवर एका महिन्यात केवळ एकदाच आऊटेज घेण्यात यावा, या भागातील ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठ्याला प्राधान्य देण्यात यावे यासाठी उपकेंद्रांना वीजपुरवठ्यााचा अतिरिक्त स्रोताची उपलब्धता करून देण्यात यावे, सर्व उपकेंद्रे एकमेकांशी जोडण्याचे काम त्वरित सुरु करण्यात यावे, उपकेंद्रातील अतिभारित वीज रोहित्राच्या ठिकाणी वाढीव क्षमतेची वीज रोहित्रे तात्काळ बसविण्यात यावी, सोबतच प्रलंबित वीज जोडण्या त्वरित देणे, वारंवार वीजपुरवठा खंडित होणाऱ्या भागातील बिघाडांचे विश्लेषण करून ते टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही साबू यांनी यावेळी केल्या.या बैठकीला महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक तथा नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, अधीक्षक अभियंते उमेश शहारे, दिलीप दोडके, नारायण आमझरे, मे. एसएनडीएलतर्फ़े राजेश तुरकर, दीपक लाबडे, शेषराव कुबडे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आढावा बैठकीपश्चात साबू यांनी मे. एसएनडीएलचे सेमिनेरी हिल्स उपकेंद्र, जयहिंद उपकेंद्र, ग्राहक सुविधा केंद्र कॉल सेंटर या ठिकाणी भेट देत तेथील कामांची पाहणीही केली.ग्राहक सेवा करतोय सशक्तयावेळी एसएनडीएलचे बिझनेस हेड सोनल खुराणा यांनी मे. एसएनडीएलच्या कामाबाबत विस्तृत सादरीकरणामार्फत कंपनीच्या एकूणच कामकाजाबाबतची माहिती उपस्थितांना दिली. उपकेंद्रांवरील भार कमी व्हावा यासाठी सुरु असलेल्या उपाययोजना, कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांची तपासणी, वीजचोरीचे आणि वीज अपघातांचे प्रमाण अधिक असलेल्या भागात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच ग्राहक सेवा सशक्त करण्यात येत असल्याचे सांगितले.तर जप्त होणार बँक गॅरंटीमहावितरणने एसएनडीएलच्या वाढत्या थकीत रकमेबाबत बैठकीत तीव्र चिंता व्यक्त केली. कंपनीने स्पष्ट केले की, थकीत रक्कम वाढून १३३ कोटी रुपये झाली आहे. ही चिंताजनक बाब आहे. जर ही रक्कम १० कोटी पेक्षा कमी झाली नाही तर एसएनडीएलची बँक गॅरंटी जप्त केली जाईल, असा इशाराही यावेळी दिला.
महावितरणची एसएनडीएलविरुद्ध कडक भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 11:24 PM
आर्थिक परिस्थिती सुदृढ करण्यासाठी स्ट्रॅटेजिक पार्टनरच्या शोधात असलेल्या वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलच्या कार्यपद्धतीबाबत महावितरणने कडक भूमिका घेतली आहे. वीज पुरवठ्यातील त्रुटींच्या वाढत्या तक्रारी पाहता महावितरणने एसएनडीएलला येत्या १५ दिवसा कृती आराखडा ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करण्याचे निर्देश दिले आहे.
ठळक मुद्देवीज पुरवठ्यासाठी ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करण्याचे निर्देश : दर १५ दिवसानी संयुक्त बैठक