लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत महायुतीने लोकसभा निवडणुकीपूर्वी लेखी आश्वासन देऊन वचननाम्यात ‘मेंढपाळ आयोग (शेफर्ड कमिशन) स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगितले. परंतु शासनाने वारंवार आश्वासन देऊनही पूर्तता न केल्यामुळे महायुतीच्या वचननाम्याची होळी आंदोलन महाराजा यशवंतराव होळकर जयंती दिनी ३ डिसेंबरला राज्यभरात करण्यात येईल, असा इशारा धनगर समाज संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी दिला आहे. युती सरकारने आरक्षणाच्या अंमलबजावणीची मानसिकता दाखविली, परंतु अद्याप केंद्र सरकारकडे शिफारस पत्र पाठविले नसून ३ डिसेंबरला धनगर आरक्षणाची अंमलबजावणीवर तात्काळ कारवाई व्हावी यासाठी लक्षवेधी आंदोलन प्रत्येक जिल्हा पातळीवर करण्यात येणार आहे. आंदोलनात महायुतीने दिलेल्या वचननाम्याची होळी करून तीव्र निषेध व्यक्त करणार असल्याचे धनगर समाज संघर्ष समितीने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
महायुतीच्या वचननाम्याची होळी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 21:51 IST
धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत महायुतीने लोकसभा निवडणुकीपूर्वी लेखी आश्वासन देऊन वचननाम्यात ‘मेंढपाळ आयोग (शेफर्ड कमिशन) स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगितले. परंतु शासनाने वारंवार आश्वासन देऊनही पूर्तता न केल्यामुळे महायुतीच्या वचननाम्याची होळी आंदोलन महाराजा यशवंतराव होळकर जयंती दिनी ३ डिसेंबरला राज्यभरात करण्यात येईल, असा इशारा धनगर समाज संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी दिला आहे.
महायुतीच्या वचननाम्याची होळी करणार
ठळक मुद्देधनगर समाज संघर्ष समितीचा इशारा