नागपूर : आंबेडकरी आंदोलनातील कार्यकर्ते कवी महेंद्र गायकवाड यांच्या ‘काजव्यांच्या खांद्यावर संगिनी’ या कवितासंग्रहातील ‘पशू’ या कवितेचा समावेश मुंबई विद्यापीठाच्या बीए प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. यंदाच्या शैक्षणिक सत्र २०२२-२३ पासून त्यांची कविता अभ्यासक्रमात अभ्यासाला राहील.
कवी गायकवाड यांचा ‘अस्तित्व गमावलेली माणसे’ हा कवितासंग्रह अलीकडेच प्रकाशित झाला असून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक मुलाखती’ हे संपादन संशोधक - अभ्यासकांत विशेष चर्चात्मक ठरले आहे. कविता, कथा, समीक्षा, संशोधन, संपादनांसह गायकवाड यांची आजवर १४ पुस्तके प्रकाशित आहेत. नामवंत संस्थांनी विविध साहित्य पुरस्कारांनी त्यांना गौरविले असून त्यांच्या काही पुस्तकांचा हिंदी अनुवाद प्रकाशनाच्या वाटेवर आहे. राज्यातील वेगवेगळ्या विद्यापीठांतील संशोधक विद्यार्थ्यांनी त्यांच्या कवितांवर एम.फिल. तसेच पीएच.डी. केली आहे.