पाटणसावंगी : सावनेर तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्वाची असलेल्या पाटणसावंगी ग्रामपंचायतचे सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे येथे काँग्रेस समर्थित गटाच्या एका महिला सदस्याची वर्णी अटळ आहे. पण येथे सरपंचपदापेक्षा उपसरपंचपदासाठी अधिक चुरस दिसून येत आहे. १७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतमध्ये १५ काँग्रेस समर्थित तर २ भाजप समर्थित उमेदवार विजयी झाले आहेत. त्यात ७ पुरुष १० महिला सदस्यांचा समावेश आहे. महिलांमध्ये सरपंचपदासाठी रोशनी सुधीर ठाकरे, सुनिता टेकाडे, सीमा चंद्रशेखर केदार यांचे नाव चर्चेत आहे. रोशनी ठाकरे यांचे पती माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत तर सीमा केदार यांचे पती वेकोली सावनेर येथे नोकरीत आहे. ग्रामस्थांच्या मते सरपंच महिला होणार असल्याने उपसरपंचही तोडीचा असावा अशी मागणी होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतचे सदस्य उपसरपंचपदासाठी कुणाला पसंती दर्शवितात हे उद्या, गुरुवारी होणाऱ्या निवडणुकीतच स्पष्ट होईल.
पाटणसावंगी ग्रा.पं.मध्ये येणार महिला राज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 4:10 AM