निशांत वानखेडेनागपूर : कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली की गरीब कुटुंबांना सर्वाधिक झळ सोसावी लागते. कोरोना महामारीच्या दुष्टचक्राने हीच अवस्था सगळ््यांंकडे घरकाम करणाऱ्या मोलकरणींची झाली आहे. १५ दिवसांपासून काम बंद झाले आहे, मार्च महिन्याचा पगारही रखडला आहे. घरचे पुरुषही मोलमजूरी करणारेच. त्यामुळे मोलकरणींच्या कुटुंबाला अतिशय हलाखीच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. घर कसे चालवावे, या विवंचनेत त्या सापडल्या आहेत.जाटतरोडीमध्ये राहणाºया सीमा पाटील आणि मालाबाई वनवे यांची व्यथा ही तमाम मोलकरणींच्या विदारकतेचे चित्र उभी करणारी आहे. जाटतरोडी नं. १ मध्ये राहणाºया सीमा अर्जुन पाटील. घरी पती व तीन मुलांचा संसार. त्यांचे पती कॉटन मार्केट परिसरात ठेला लावून फळ विक्रीचे काम करतात. त्यांचे कामही दीड-दोन महिन्यांपासून बंद आहे. माकेटमध्ये फळ विक्रीसाठी जाताही येत नाही. सीमा या दोन-तीन घरी जाऊन काम करतात. त्यातून चार-साडेचार हजार पगार मिळतो. सुट्या झाल्या तर पैसा कापला जातो व पगार यापेक्षा कमी होतो. २२ मार्चपासून त्यांचेही काम बंद झाले आहे. शिवाय मार्च महिन्याचा पगारही यात रखडला. घरमालकांनीही तो देण्याची तसदी घेतली नाही. घरात असलेला पैसा अडका आणि धान्यही संपत आले आहे. किराणा दुकानदारांनी अधिक उधारी देण्यास नकार दिला आहे. लॉकडाउनचा काळ पुढेही वाढणार असल्याचे दिसते. त्यामुळे आता उपाशी राहून जगायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. जाटतरोडी नं. २, इंदिरानगरमध्ये राहणाºया मालाबाई देवीदास वनवे यांची परिस्थिती काही वेगळी नाही. पती रिक्षा चालक. काही वर्षापूर्वी लकवा मारलेला. आजही त्यांच्या एक हात काम करीत नाही. या अवस्थेत सकाळी रिक्षा घेऊन जातात पण सवारी मिळत नसल्याने निराश परतावे लागते. घरी अर्धांगवायुने पडलेली म्हातारी सासू व दोन मुले आहेत. मोठ्या मुलाचे कामही लॉकडाऊनमध्ये बंद पडले. मालाबाई यांचे काम २२ मार्चपासून बंद झाले. त्या महिन्याचा पगारही मिळाला नाही. या काळात होते नव्हते ते सर्व संपले आहे. पैसा नाही आणि धान्यही नाही. काही दिवस उधार करून घर चालविले पण आता तेही मिळणे थांबले. आता जगायचे कसे, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. मालाबाई यांचे कुटुंब हताश आणि निराश मनस्थितीत जगत आहे. सीमा पाटील आणि मालाबाई यांचे कुटुंब त्या हजारो मोलकरिणींचे प्रतिनिधित्व करणारे आहे ज्या अतिशय विदारक अवस्थेत दिवस कंठत आहेत. कोरोनाच्या उद्रेकाने त्यांचे जगणेच उद्ध्वस्त केले आहे. या अवस्थेत त्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे.- या सुट्यात पगार देण्याचे आवाहन फोल आपल्या घरी काम करणाºया महिलांना कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाउनच्या काळात सुट्यांचा पगार कापू नये, असे भावनिक आवाहन पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि अनेक संघटनांनीही केले आहे. मात्र या आवाहनाला फारसे कुणी गंभीरतेने घेतले नाही. सीमा पाटील व मालाबाई वनवे यांनी सांगितल्यानुसार मार्च महिन्याचा पगार देण्याची तसदीही घर मालकांनी घेतली नाही. एखादी सुटी पडली तरी त्याचाही पैसा कापला जातो. त्यामुळे लॉकडाउनच्या काळातील पैसा देतील असा मानुसपणा दिसत नाही.- सरकारी धान्य दुकानाचीही मदत नाहीसीमा आणि मालाबाई यांच्याकडे शेंदरी रंगाचे एपीएल रेशनकार्ड आहे. त्यामुळे सरकारी धान्य दुकानदारांनी त्यांना धान्य देण्यास नकार दिला. केवळ बीपीएल कार्डधारकांनाच धान्य मिळेल, असे ते सांगतात. आमच्या अशा हालाखीच्या परिस्थितीत तरी आम्हाला स्वस्तात धान्य देण्यात यावे, अशी मागणी करीत आम्ही काय उपाशी मरावे काय, असा उद्विग्न सवाल त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.