लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आॅरेंज सिटी नागपूरची ओळख ही ‘झिरो माईल’ आहे. परंतु मेट्रो रेल्वेतील अधिकारी मात्र माहीत नाही ही ओळख बदलविण्याच्या तयारीत का आहेत. इतकेच नव्हे तर जाहिरातीसाठीसुद्धा त्याचा उपयोग करणार आहे. त्यामुळे नवीन ओळख प्रस्थापित करण्याचा दावा करणारी मेट्रो रेल्वे त्याचा व्यावसायिक उपयोग कसा काय करू शकते? स्पेशल प्लानिंग अॅथॉरिटीचा दर्जा मिळाल्याने मेट्रो असे करू शकते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.असे सांगितले जाते की, मुंजे चौकात उभारण्यात येत असलेल्या मेट्रो स्टेशनच्या वर (मुकुट) ‘क्राऊन’ लावण्यात येणार आहे. ते स्टील आणि पॉली कार्बोनेटच्या मदतीने उभारले जाईल. सीताबर्डी मेट्रो स्टेशनची उंची ४० मीटर असेल. त्याच्यावर क्राऊन चढवण्यात येईल. त्याची उंची १४ मीटर असेल. २५ बाय ३५ मीटरचे बांधकाम असेल. क्राऊनच्या आतील भाग ‘डोम’ आकाराचा असेल. येथे जाहिरातबाजी करता येईल. अगोदर अशी योजना नव्हती. परंतु आता नवीन ओळख निर्माण करण्याच्या नावावर कमाईचा नवीन फंडा महामेट्रोने शोधला आहे. मुंजे चौक सीताबर्डीतील इंटरचेंज स्टेशन हे नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा केंद्रबिंदू म्हणजेच जंक्शन राहणार आहे. येथून नागरिकांना शहराच्या चारही दिशेने मेट्रोने प्रवास करता येईल.झिरो माईल असेल आकर्षणाचे केंद्रशहरातील झिरो माईल केवळ शहरातील नागरिकांसाठीच नव्हे तर बाहेरच्या पर्यटकांसाठीसुद्धा नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिलेले आहे. झिरो माईल शहराची ऐतिहासिक ओळख आहे. त्याचा एक सुवर्ण इतिहास आहे. इंग्रजांच्या काळात झिरो माईल बनविण्यात आले होते. हे त्यावेळचे देशाचे केंद्रबिंदू होते. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी याची माहितीसुद्धा आहे. परंतु ते आता नागपूर शहराची नवीन ओळख निर्माण करण्याचा तयारीत आहेत.
नागपूरची मुख्य ओळख झिरो माईल हीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 9:53 PM
आॅरेंज सिटी नागपूरची ओळख ही ‘झिरो माईल’ आहे. परंतु मेट्रो रेल्वेतील अधिकारी मात्र माहीत नाही ही ओळख बदलविण्याच्या तयारीत का आहेत. इतकेच नव्हे तर जाहिरातीसाठीसुद्धा त्याचा उपयोग करणार आहे. त्यामुळे नवीन ओळख प्रस्थापित करण्याचा दावा करणारी मेट्रो रेल्वे त्याचा व्यावसायिक उपयोग कसा काय करू शकते? स्पेशल प्लानिंग अॅथॉरिटीचा दर्जा मिळाल्याने मेट्रो असे करू शकते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
ठळक मुद्देशहराची ओळख बदलण्याच्या तयारीत मेट्रोमुंजे चौकातील ‘क्राऊन’ होणार उत्पन्नाचे साधन