शेखर सावरबांधे : शिवसेनेतर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार नागपूर : गुणवंत विद्यार्थी भविष्यात कोण होईल, हे सांगता येत नाही. मात्र त्यांनी गुणवत्तेत सातत्य ठेवल्यास भविष्यात नक्कीच मोठा माणूस होईल, असा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे यांनी व्यक्त केला. शिवसेनेतर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. शिवसेनेतर्फे दक्षिण नागपुरातील मानेवाडा प्रभागात गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला पूर्व विदर्भ सहसंपर्कप्रमुख रमेश बक्षी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. शिवसेनेतर्फे दक्षिण नागपुरातील सर्व प्रभागामध्ये अशा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच प्रभागातील ज्येष्ठ मंडळींचासुद्धा सत्कार करण्यात आला. यामध्ये परशुराम भांगे, सुधाकर हिवसे, मधुकर रेवतकर, पंजाबराव बडवाईक, शरद सरदार, भगवान बोंद्रे, भागवत वायगावकर, प्रमिला राऊत, कांताराम निखारे, सुरेश वरुडकर, राजेंद्र दाबणे, बंडूभाऊ कोपरकर, देवीदास मुराळ, प्रकाश बापट आदींचा समावेश होता. या कार्यक्रमाचे आयोजन उपशहरप्रमुख प्रवीण सांदेकर यांनी केले होते. यावेळी नगरसेविका शीतल घरत, मंगला गवरे, जगतराम सिन्हा, मुन्ना रफिक, नंदु थोटे, श्याम तेलंग, गणेश डोईफोडे, प्रवीण गवरे, शशिकांत ठाकरे, ज्योती होटे, सुनील बिडवाईक, कल्पना जोगे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
गुणवत्तेत सातत्य ठेवा
By admin | Published: August 01, 2014 1:12 AM