लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुलीला वारंवार फोन करून त्रास देणाऱ्या आरोपीला मुलीच्या पित्याने समजावण्याचा प्रयत्न केले असता आरोपीने आपल्या साथीदारांसह मुलीच्या घरावर दगडफेक करून हल्ला चढवला. मुलीच्या आईवडिलांना मारहाण करून वाहनांची तोडफोड केली. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. अक्षय वसंतराव कडू (वय २१), वसंतराव कडू (रा. श्रीरामनगर) अशी या प्रकरणातील मुख्य आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासोबत या गुन्ह्यात आणखी चार साथीदार आहेत.पिरॅमीड सिटीजवळच्या श्रीरामनगरात राहणारे दिनेश (वय ३९) यांच्या मुलीच्या मोबाईलवर आरोपी अक्षय वारंवार फोन करतो. मुलीने हा त्रास आपल्या वडिलांना सांगितला. त्यामुळे सोमवारी सायंकाळी दिनेश यांनी अक्षयला घराजवळ बोलवले. त्याला त्यांनी मुलीला त्रास देऊ नको, असे सांगितले. त्यावरून आरोपीसोबत त्यांचा वाद झाला. त्यानंतर अक्षयने आपल्या वडिलांना फोन करून बोलविले. आरोपी वसंतराव कडू त्याच्या चार साथीदारांसह दिनेशच्या घरावर चालून आले. कडू पितापुत्र आणि त्यांच्या साथीदारांनी दिनेशच्या घरावर हल्ला चढवून दगडफेक केली. दिनेश यांना शिवीगाळ आणि मारहाण केली. त्यांची पत्नी समजविण्यासाठी आली असता आरोपींनी तिलाही मारहाण केली आणि घरासमोर असलेल्या कारसह अन्य वाहनांची तोडफोड केली. या प्रकारामुळे श्रीरामनगरात दहशत निर्माण झाली. मोठ्या संख्येत नागरिक जमल्याचे पाहून आरोपी पळून गेले. दिनेश यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अक्षय कडूला अटक करण्यात आली. त्याचे वडील आणि अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
नागपुरात युवतीला त्रास देणाऱ्या मजनूची भाईगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 9:21 PM
मुलीला वारंवार फोन करून त्रास देणाऱ्या आरोपीला मुलीच्या पित्याने समजावण्याचा प्रयत्न केले असता आरोपीने आपल्या साथीदारांसह मुलीच्या घरावर दगडफेक करून हल्ला चढवला. मुलीच्या आईवडिलांना मारहाण करून वाहनांची तोडफोड केली. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी सायंकाळी ही घटना घडली.
ठळक मुद्देमुलीच्या घरावर हल्ला : आईवडिलांना मारहाण : दगडफेक, वाहनांचीही तोडफोड