लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात कोरोना रुग्णांना बेडसाठी भटकंती करावी लागत आहे. त्यांना वेळीच उपचार मिळावे, यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने कोरोना रुग्णांना खासगी व शासकीय रुग्णालयात बेड उपलब्ध करून देण्यासाठी अधिकचे प्रयत्न करावे. यासाठी एक मॉनिटरिंग कमिटी गठित करण्यात यावी, असे निर्देश आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी गुरुवारी कोविड-१९ च्या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेतलेल्या आढावा बैठकीत दिले.खासगी रुग्णालयात खाटांची संख्या मोठ्या प्रमाणात असूनही फक्त ३,७०० बेड उपलब्ध केले आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मॉनिटरिंग कमिटी समिती दररोज खासगी रुग्णालयांशी संपर्क करून कोविड रुग्णांसाठी व्हेंटिलेटर,बेडस आणि आईसीयू बेड उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करेल.आरोग्य विभागाला पॉझिटिव्ह रुग्णांना झोननिहाय कॉल सेंटरच्या माध्यमाने संपर्क साधण्याचे निर्देश दिले. सेंट्रलाईज सिस्टीममध्ये दररोज १२०० ते १३०० कोरोना रुग्णांना संपर्क करणे शक्य होत नसल्याने झोन स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आले आहे. खासगी रुग्णालयाकडून कोविड रुग्णांच्या नातेवाईकांकडून मोठी रक्कम डिपॉझिट म्हणून घेत असल्याबाबत कुकरेजा यांनी नाराजी व्यक्त केली. सभेत अतिरिक्त आयुक्त राम जोशी , संजय निपाणे, उपसभापती नागेश सहारे, सदस्य संजय बुर्रेवार, सरिता कावरे, आशा उईके, लीला हाथीबेड व वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चिलकर, डॉ.विजय जोशी, टाटा ट्रस्टचे डॉ. टिकेश बिसेन आदी उपस्थित होते.बैठकीत दिलेले निर्देश- कोरोना मृतदेहावर घाटावर अंत्यसंस्कार केल्यानंतर पीपीई किटची योग्य विल्हेवाट लावा.- पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरातून कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करा.
कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 9:20 PM