लोकमत न्यून नेटवर्कनागपूर : दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यानिमित्त देश-विदेशातून येणाºया अनुयायींंसाठी पाणी, शौचालय, दिवे अशा सोईसुविधा उपलब्ध कराव्यात. परिसर स्वच्छ राहील यासाठी नियोजनानुसार अधिकाºयांनी जबाबदारी पार पाडावी. कोणाचीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश महापालिका आयुक्त अश्विन मुदगल यांनी रविवारी दिले. दीक्षाभूमी परिसराची पाहणी करून त्यांनी व्यवस्थेचा आढावा घेतला.अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, स्मारक समितीचे विश्वस्त डॉ. सुधीर फुलझेले, विलास गजघाटे, कार्यकारी अभियंता संजय गायकवाड, प्रदीप राजगिरे, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजीव जयस्वाल, डी. डी. जांभूळकर, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (वैद्यकीय) डॉ. अनिल चिव्हाणे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, लक्ष्मीनगर झोन सहायक आयुक्त सुवर्णा दखने, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, डॉ. अनमोल टेंभुर्णे, उपअभियंता राजेश रहाटे, उद्यान निरीक्षक अमोल चोरपगार, उपअभियंता रवींद्र मुळे, सिद्धार्थ म्हैसकर आदी उपस्थित होते. स्नानगृहाकरिता पाणी पुरवठा करण्यात येतो. पिण्याकरिता स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी अस्थायी नळ उभारण्यात येतात. परिसरातील सफाईकरिता मनपाच्या स्वास्थ विभागांतर्गत (स्वच्छता) केली जाते. यासोबतच लोककर्म विभागांतर्गत शामियाने, बॅरिकेट्स, अस्थायी शौचालय व स्नानगृहे उभारण्यात येणार आहे. अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ महापालिके चे नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे. या परिसरात अतिरिक्त ६४ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.विद्युत विभागाअंतर्गत प्रखर दिवे, पथदिवे, हॅलोजन लावले जात आहेत. परिसरात जनरेटरची व्यवस्था करण्यात येणार आहे.अग्निशमन विभागातर्फे आगीचे बंब तसेच आरोग्य विभागातर्फे अॅम्बुलन्स दीक्षाभूमी परिसरातील पोलीस नियंत्रण कक्षाजवळ २४ तास तैनात करण्यात येणार आहे. या कामाचा आयुक्तांनी आढावा घेतला.
दीक्षाभूमीवर सुविधा उपलब्ध करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 1:39 AM
दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यानिमित्त देश-विदेशातून येणाºया अनुयायींंसाठी पाणी, शौचालय, दिवे अशा सोईसुविधा उपलब्ध कराव्यात. परिसर स्वच्छ राहील यासाठी नियोजनानुसार ......
ठळक मुद्देआयुक्तांचे निर्देश : सोईसुविधांचा आढावा घेतला