लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सतरंजीपुरा येथील रहिवाशी अतुल डहरवाल यांचा खून करून मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील सौंसरजवळ लोधीखेडा येथे मृतदेह सापडला. अतुल डहरवाल हा व्यापारी क्षेत्रातील धडधाकट तरुण होता व चार-पाच लोकांना पेलू शकणार नाही अशी या तरुणाची कदकाठी होती. त्यामुळे कुणीतरी मोठ्या व्यक्तीच्या इशाऱ्यावर हा खून झाला आहे, असा संशय व्यक्त करीत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आ. कृष्णा खोपडे यांनी केली आहे.अतुलचे अपहरण करून इतक्या दूर हत्या करून टाकण्यामागे तीन-चारपेक्षा जास्त व्यक्तीचा हात असल्याचे लक्षात येते. छिंदवाडा पोलीस मुख्य आरोपीवर फोकस करीत नसल्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक आहे. याकरिता आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे खोपडे यांनी सांगितले. दरम्यान, मृताचे आई-वडिलांसह नगरसेवक दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. गडकरी यांनी लगेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्याशी फोनवर संवाद साधला व पत्रही फॅक्स केले. पीडित कुटुंबीयांना न्याय देण्याकरिता लागेल ती मदत करण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिले. यानंतर सतरंजीपुरा, सुभाष पुतळा येथे नागरिकांनी कँडल मार्च काढून या घटनेचा निषेध केला. लकडगंजचे पोलीस निरीक्षकांना निवेदनही देण्यात आले.
नागपुरातील अतुल डहरवाल यांच्या हत्येची उच्चस्तरीय चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 11:12 PM
सतरंजीपुरा येथील रहिवाशी अतुल डहरवाल यांचा खून करून मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील सौंसरजवळ लोधीखेडा येथे मृतदेह सापडला. अतुल डहरवाल हा व्यापारी क्षेत्रातील धडधाकट तरुण होता व चार-पाच लोकांना पेलू शकणार नाही अशी या तरुणाची कदकाठी होती. त्यामुळे कुणीतरी मोठ्या व्यक्तीच्या इशाऱ्यावर हा खून झाला आहे, असा संशय व्यक्त करीत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आ. कृष्णा खोपडे यांनी केली आहे.
ठळक मुद्देकृष्णा खोपडे यांची मागणी : मुख्यमंत्र्यांना भेटणारनागरिकांनी कँडल मार्च काढून नोंदवला निषेध