लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : योगशास्त्र हे भारतीय संस्कृती आणि इतिहासाचे प्रतीक असून, योग आपला ऐतिहासिक वारसा आहे. आज जगाने योगशास्त्राला मान्यता दिली आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने योगाप्रती अभिमान बाळगला पाहिजे. ७० वर्षापूर्वी जनार्दन स्वामींनी नि:स्वार्थपणे योगाच्या प्रसाराचे कार्य केले. प्रत्येकाने आपल्या आरोग्यासाठी योगाचा स्वीकार करण्याची गरज आहे. योगाचा प्रसार शेवटच्या माणसापर्र्यंत जावा आणि प्रत्येकाचे जीवन कुठलेही औषध न घेता निरोगी रहावे, यासाठी नियमित योग करा आणि निरोगी जीवन जगा, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. नागपूर महापालिका आणि नेहरू युवा केंद्र संघटनेतर्फे जागतिक योग दिनाचे आयोजन यशवंत स्टेडियम येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नितीन गडकरी उपस्थित होते. जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महापौर नंदा जिचकार, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे सर्वेसर्वा रामभाऊ खांडवे, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, मनपा आयुक्त अजिभित बांगर, उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे, माजी महापौर प्रवीण दटके, नगरसेवक दयाशंकर तिवारी, राम जोशी, प्रमोद तभाने, नेहरू युवा केंद्राचे शरद साळुंके आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला विविध योगाभ्यासी मंडळाच्या सदस्यांनी उपस्थिती दर्शविली होती. प्रसंगी सामूहिक योगाभ्यास करण्यात आला. योगातील विविध आसने, प्राणायाम, सूर्यनमस्कार सादर करण्यात आले. सामूहिक ओंकाराचा गजर व शांतीमंत्र म्हणण्यात आले. तर सहज योगाचे प्रात्यक्षिक सुद्धा देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन दयाशंकर तिवारी यांनी केले. आभार शिक्षण सभापती दिलीप दिवे यांनी मानले. गडकरींनीही केला योगाभ्यास नागपूर महापालिकेने आयोजित केलेल्या जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमात पहाटेच गडकरी उपस्थित झाले. जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाच्या सदस्यांनी मंचावर उपस्थित आणि सामूहिक योगात सहभागी झालेल्यांकडून योगाचे प्रात्यक्षिक करवून घेतले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीसुद्धा या सामूहिक योगाभ्यासात सहभागी झाले होते. गडकरींनी भ्रमरी प्राणायाम, अनुलोम विलोम, पद्मासन व विविध योगाची आसने केली. यावेळी त्यांनी ओंकाराचा गजर केला आणि सामूहिक शांतीमंत्र सुद्धा म्हंटला.
नियमित योग करा आणि निरोगी जीवन जगा : नितीन गडकरींचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 9:31 PM
योगशास्त्र हे भारतीय संस्कृती आणि इतिहासाचे प्रतीक असून, योग आपला ऐतिहासिक वारसा आहे. आज जगाने योगशास्त्राला मान्यता दिली आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने योगाप्रती अभिमान बाळगला पाहिजे. ७० वर्षापूर्वी जनार्दन स्वामींनी नि:स्वार्थपणे योगाच्या प्रसाराचे कार्य केले. प्रत्येकाने आपल्या आरोग्यासाठी योगाचा स्वीकार करण्याची गरज आहे. योगाचा प्रसार शेवटच्या माणसापर्र्यंत जावा आणि प्रत्येकाचे जीवन कुठलेही औषध न घेता निरोगी रहावे, यासाठी नियमित योग करा आणि निरोगी जीवन जगा, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला.
ठळक मुद्देयशवंत स्टेडियमवर झाला सामूहिक योगाभ्यास