शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी बंडखोराला साथ; सुनील केदारांचा अजब दावा
2
पवार घराण्यात कटुता; दूर होईल असे वाटत नाही; अजित पवार यांनी प्रथमच व्यक्त केले मत
3
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
4
भर सभेतच असदुद्दीन ओवैसींना पोलिसांनी दिली नोटीस; त्यानंतर काय घडलं? 
5
Children's Day 2024: या बालदिनी LIC च्या 'या' चिल्ड्रन स्कीममध्ये करा गुंतवणूक, मुलांचं भविष्य होईल सुरक्षित
6
IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!
7
Exclusive: 'रात्रीस खेळ चाले' ते थेट 'सिंघम अगेन'! अभिनेत्री व्हायचं नव्हतं, मग बॉलिवूडपर्यंत कशी पोहोचली भाग्या?
8
Suzlon Energy Share Price : ३०% च्या घसरणीनंतर Suzlon Energy च्या शेअरमध्ये तुफान तेजी, लागलं अपर सर्किट; कारण काय?
9
Dev Diwali 2024: आज देवदिवाळी, उद्या त्रिपुरी पौर्णिमा, कार्तिक स्नान तसेच तुलसी विवाह समाप्ती!
10
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
11
'रंग माझा वेगळा'मधील 'दिपा'साठी सावळ्या मुलीलाच कास्ट का केलं नाही? लेखक खरं कारण सांगत म्हणाला...
12
Niva Bupa Health IPO : ₹७४ च्या शेअरनं दिला ६% लिस्टिंग गेन; पण जून तिमाहीत थंड होता निवा बुपाचा व्यवसाय, शेअरची स्थिती काय?
13
Children's Day 2024: मुलांच्या नावावर गुंतवणुकीचे ८ बेस्ट पर्याय; शिक्षण ते लग्न चिंताच सोडा
14
'सिंघम अगेन'सोबत टक्कर टाळता आली असती का? 'भूल भूलैय्या ३'चे निर्माते म्हणतात- "मी प्रयत्न केले पण.."
15
केंद्रीय मंत्र्यांनी केलं वाचनालयातील पंख्याचं उदघाटन, आता फोटो होताहेत व्हायरल   
16
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' वस्तूंचे करा दान, मिळवा इच्छापूर्तीचे वरदान!
17
'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, "तो दोन तास..."
18
Share Market Today : घसरणीच्या सत्रांनंतर अखेर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टी वधारला; मिडकॅप-स्मॉलकॅप मध्ये खरेदी
19
अमित ठाकरे यांना मतदान का करावे? ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितले 'हे' 10 मुद्दे
20
Richest Indian in Canada : कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान

बचत गटांसाठी मॉल उघडणार

By admin | Published: March 14, 2016 3:07 AM

राज्यातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध व्हावी,

देवेंद्र फडणवीस : महिला उद्योजिका मेळाव्याचा समारोपनागपूर : राज्यातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्ह्याची ठिकाणे व नगरपालिका असलेल्या शहरात मॉल उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली. महापालिकेतर्फे कस्तूरचंद पार्क येथे आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. महापौर प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे, मल्लिकार्जुन रेड्डी, स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रश्मी फडणवीस, शिक्षण सभापती गोपाल बोहरे, भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष माधवी नाईक, आयुक्त श्रावण हर्डीकर, अपर आयुक्त नयना गुंडे, बसपाचे गटनेते गौतम पाटील, समाजकल्याण अधिकारी सुधा इरस्कर आदी उपस्थित होते.मानव संसाधनाच्या दोन चाकांचे बळ मिळाले तरच गतिशील विकास शक्य आहे. राज्यात महिला बचत गटांचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करण्याचा शासनाचा मानस आहे. मोठे उद्योगपती राष्ट्राचे पैसे बुडवतात. परंतु महिला बचत गट महामंडळ वा बँकांकडून घेतलेले कर्ज प्रामाणिकपणे परत करतात. महिला यशस्वीपणे उद्योग चालवू शकतात. चांगले काम करणाऱ्या महिला बचत गटांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभे राहील, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. महापालिका गेल्या सात वर्षांपासून उद्योजिका मेळाव्याचे आयोजन करीत आहे. या माध्यमातून बचत गटांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या मेळाव्याला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हा स्तुत्य उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. फडणवीस यांच्या हस्ते यशस्वी बचत गटांच्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यात हस्तशिल्प बचत गटाच्या पुष्पा ठाकरे, जयदुर्गा बचत गटाच्या संगीता देसाई, चित्रशाळा माता बहुउद्देशीय संस्थेच्या वर्षा मेहर, शीलवंत बचत गटाच्या अश्विनी पाटील, प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या डॉ. रिना खुरपडी तसेच प्रजासत्ताकदिनी दिल्ली येथील मुख्य समारंभात सहभागी झालेल्या बॅ. शेषराव वानखेडे विद्यानिकेतन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळेच्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. रश्मी फडणवीस यांनी प्रास्ताविकातून मेळाव्याची माहिती दिली तर आभार साधना बरडे यांनी मानले. महापालिकेतील पदाधिकारी, अधिकारी तसेच बचत गटांच्या महिला उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)