मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया व राहुल गांधींच्या प्रतिनिधींकडून बाळू धानोरकर यांना पुष्पचक्र अर्पण

By कमलेश वानखेडे | Published: May 31, 2023 06:09 PM2023-05-31T18:09:21+5:302023-05-31T18:30:40+5:30

Nagpur News काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्यावर चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे हजारो लोकांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप देण्यात आला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे प्रतिनिधी म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी पुष्पचक्र अर्पण केले.

Mallikarjun Kharge, Sonia and Rahul Gandhi's representatives offering floral wreaths | मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया व राहुल गांधींच्या प्रतिनिधींकडून बाळू धानोरकर यांना पुष्पचक्र अर्पण

मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया व राहुल गांधींच्या प्रतिनिधींकडून बाळू धानोरकर यांना पुष्पचक्र अर्पण

googlenewsNext

कमलेश वानखेडे
नागपूर : काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्यावर चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे हजारो लोकांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप देण्यात आला. बाळू धानोकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यस्कार करण्यात आले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे प्रतिनिधी म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी पुष्पचक्र अर्पण केले. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी यांचा शोकसंदेश घेऊन सहप्रभारी आशिष दुआ आले होते तर विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी पुष्पचक्र अर्पण केले. तसेच राहुल गांधी यांच्यावतीने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पुष्पचक्र अर्पण केले.
यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनिल केदार, यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेसचे नेते व पदाधिकारीही तसेच राज्यातील विविध पक्षांचे नेते व लोकप्रितिनिधी व लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शोकसंदेश

- बाळू धानोरकर यांना मी फार पूर्वीपासून ओळखतो. ते अत्यंत कष्टाळू, प्रामाणिक व्यक्ती होते. पती आणि कुटुंबातील सदस्य गमावणे नेहमीच दुःखदायक असते, अशा अकाली निधनाला सामोरे जाणे अत्यंत कठीण असते. धानोरकर यांच्या निधनाने फक्त चंद्रपूरचीच हानी झालेली नाही तर काँग्रेस कुटुंबाचीही मोठी हानी झाली आहे.
- मल्लिकार्जून खर्गे, अध्यक्ष, अ.भा. काँग्रेस समिती

पतीचे अकाली निधन तुमच्या कुटुंबावर विशेषतः तुमच्यासाठी मोठा आघात आहे. नियतीपुढे आपले काही चालत नाही, वास्तव आपल्याला स्विकारावे लागते.मला विश्वास आहे की तुम्ही या कठीण प्रसंगाला मोठ्या धैर्याने तोंड द्याल. काँग्रेस पक्षाचे खासदार या नात्याने ते जनतेचे प्रश्न हिरीरीने मांडत असत, त्यांच्या अकाली निधनाने मोठी हानी झाली आहे.
- सोनिया गांधी, माजी अध्यक्ष, अ.भा. काँग्रेस समिती

Web Title: Mallikarjun Kharge, Sonia and Rahul Gandhi's representatives offering floral wreaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.